जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील बारा संशयितांचे श्राव तपासणीसाठी रवाना

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील एक महिला डॉक्टर कोरोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या पंधरा जणांचे अहवाल निरंक आले असताना त्यांचा संपर्कात आलेल्या अन्य बारा व्यक्तींचा शोध आरोग्य विभागाने घेऊन त्यांचे श्राव आपल्या ताब्यात घेतले आहे.व ते तपासणीसाठी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलला पाठवले असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

दरम्यान धोत्रे येथील आजोबांनी आपल्या नातवांना ठाणे येथून आणले असताना आरोग्य विभागाने त्यांना जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण कक्षात रवाना केले असल्याने धोत्रे गावातील कोरोना साथीच्या संसर्गाचा धोका टळला आहे.मात्र चौदा वर्षीय नातीला कोरोना संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे.दरम्यान या आजोबांची वस्ती गावापासून एकांतात असल्याने या गावात टाळेबंदीची गरज नसल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगांव शहरातील एका माध्यमिक शाळेत लिपिक म्हणून कार्यरत असलेले मात्र राहाता तालुक्यातील लोणी येथील मूळ रहिवासी असलेल्या इसमाचा कोरोना तपासणी अहवाल सकारात्मक आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील निकटवर्तीय असे एकुण २० व्यक्तींची रवानगी आरोग्य विभागाने विलगीकरण कक्षात केली होती व त्यांच्या श्रावांची तपासणी करण्यात आली होती.त्यांच्या पैकी आज पर्यंत पंधरा जणांचे अहवाल निरंक आले आहे.दरम्यान एका खाजगी महिला डॉक्टर या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आल्या होत्या.त्यांचा अहवाल खाजगी रित्या तपासणीसाठी पाठवला होता.तो बाधित आल्याने कोपगावात खळबळ उडाली होती.त्यामुळे प्रशासनासह नागरिकांनी पुन्हा धसका घेतला होता.व तहसीलदार,मुख्याधिकारी व पोलीस अधिकारी यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या दोन टप्प्यात पंधरा जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठवले होते.त्यांचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून ते पंधराही अहवाल निरंक आले आहे.त्यामुळे कोपरंगावकरानी समाधान व्यक्त केले असताना आज या महिला डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या आणखी १२ व्यक्तींचा शोध घेतला आहे.व त्यांचे विलगीकरण करून त्यांचे अहवाल आज नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलला तपासणीसाठी पाठवलेले आहे.आता कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिकांचे या अहवालाकडे लक्ष लागून आहे.

त्या कोरोना बाधित महिला डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या पंधरा जणांचे अहवाल दोन टप्यात तपासणीसाठी पाठवले होते.त्यांचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून ते पंधराही अहवाल निरंक आले आहे.त्यामुळे कोपरंगावकरानी समाधान व्यक्त केले असताना आज या महिला डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या आणखी १२ व्यक्तींचा शोध घेतला आहे.व त्यांचे विलगीकरण करून त्यांचे अहवाल आज नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलला तपासणीसाठी पाठवलेले आहे.

दरम्यान धोत्रे येथील आजोबांनी आपल्या नातवांना ठाणे येथून आणले असताना आरोग्य विभागाने त्यांना जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण कक्षात रवाना केले असल्याने धोत्रे गावातील कोरोना साथीच्या संसर्गाचा धोका टळला आहे.मात्र चौदा वर्षीय नातीला कोरोना संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे.दरम्यान या आजोबांची वस्ती गावापासून एकांतात असल्याने या गावात टाळेबंदीची गरज नसल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आहे.त्यामुळे हि टाळेबंदी टाळणे शक्य असल्याने ती टाळल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलें आहे.सावधगिरी हि धोत्रे गावी कामी आल्याने यापुढे ती अधिक कटाक्षाने पालवी लागणार असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close