जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

भर पावसाळ्यात..त्या निधीतील डांबरी रस्त्यांचे काम वेगात !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत सुभद्रानगर सह विविध प्रभागात तत्कालीन भाजप सरकारच्या कालखंडात मंजूर झालेल्या दोन कोटी रुपयांची सुमारे सतरा रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणासह डांबरीकरणाचे काम ऐन पावसाळ्यात सुरु असल्याने नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या गलथान कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.

कोपरगावचे सुभद्रानगर येथे काम दर्जेदार चालू असून पाऊस केवळ पाच दहा मिनिटे झाला असल्याचा दावा केला आहे.व हे काम अवघे साडेसहा लाखात पाचशे मीटर डांबरीकरणाचे काम चालू असून स्थानिक नागरिकांची या कामाबाबत कुठलीही तक्रार नाही-नगरसेवक जनार्दन कदम

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत रस्त्यांची मोठी दुरावस्था झाल्याने या हि स्थिती सुधारण्यासाठी तत्कालीन भाजप सरकारने दोन कोटींचा निधी मंजूर केला होता.मात्र नगरपरिषदेत या पक्षाचा अध्यक्ष नसल्याने तत्कालीन भाजप आमदारांनी हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचे अलौकिक काम केल्याने त्यावेळी तत्कालीन आमदार व पुर्वाश्रमीचे भाजप नेते व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्यात चांगलाच कलगीतुरा व अवकाळी शिमगा रंगला होता.आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या.दरम्यान या निधीवरून नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात जाण्याचा निर्णय जाहीर केला होता.

याबाबत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी,तत्कालीन लोकप्रतिनिधींनी केवळ कुटील डाव करवून हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पळवला व आपला स्वार्थ साधण्यासाठी विधानसभा निवडणुकीआधीच हि कामे पूर्ण केल्याच्या खोट्या बातम्या छापून घेतल्या होत्या त्या वेळी आपण या बाबीकडे लक्ष वेधले होते.याची आठवण करून देऊन आता तरी कामे दर्जेदार करावी-अध्यक्ष विजय वहाडणे

मात्र त्यानंतरही नगर जिल्हाधिकाऱ्यानी राजकीय रेट्यामुळे या निधीच्या कामाच्या निविदा काढून कामाला गती दिली होती.व विधानसभा निवडणुकी आधीच हि कामे मार्गी लावली होती.त्यांचे काम मात्र सुरु झाले नव्हते.मात्र निवडणुकीनंतर हि कामे लगेच सुरु होणे गरजेचे असताना ती प्रलंबित झाली होती मात्र ती ऐन पावसाळ्यात सुरु झाल्याने व डांबर व पाण्याचे वैर सर्वश्रुत असताना हे प्रगतीपथावर असलेले रस्ते पक्के कसे होणार ? हा साधा प्रश्न निर्माण झाला आहे.कॉंक्रिटीकरण करणे हि बाब नागरिक समजू शकतात मात्र डांबरीकरण पावसाळ्यात कसे होऊ शकते हा प्रश्नाने जनतेला चक्रावून सोडले आहे.

या बाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्याशी संपर्क साधला असता नगरपरिषद हद्दीत जरी हि कामे असली तरी हि कामे सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे.त्या कामावर त्यांचेच नियंत्रण आहे.पालिका हद्दीतील कामे जास्त पावसामुळे आम्ही बंद केली असल्याचे सांगितले आहे.

त्यामुळे रस्त्याचे काम केल्याचे समाधान नेते,अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना मिळेलही पण या कामाचा पोबारा अल्पावधीत झाल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळे हि कामे तातडीने बंद करून पाऊस संपल्यावर हि कामे सुरु करून पक्की व गुणवत्तापूर्ण करावी.हि कामे एकतर एकोणाविस वर्षाने होत आहे त्यामुळे ती गुणवत्तापूर्ण होणे गरजेचे आहे.अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरपरिषद गटनेते विरेंन बोरावके यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close