कोपरगाव तालुका
..या उजव्या कालव्यावरील पुलाचे भूमिपूजन संपन्न

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सुरेगाव येथे सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत ८०.३४ लक्ष निधीतून बांधण्यात येणाऱ्या गोदावरी उजव्या कालव्यावरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन आज आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी कोपरगाव पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व कोळपेवाडीचे सरपंच सूर्यभान कोळपे,संचालक राजेंद्र मेहेरखांब,गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे संचालक ज्ञानेश्वर हाळनोर, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, सुरेगाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष वाल्मिक कोळपे आदी आदी मान्यवर सुरक्षित अंतर पाळुन उपस्थित होते.