जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

गोळीबार करणारा आरोपी पोलिसांनी केला जेरबंद !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील किशोर वाईन्स या दुकानातील आपल्या दिवसभराचा गल्ल्याचा हिशेब करून ती रक्कम घराकडे घेऊन जात असलेल्या महिलेला त्यांच्या घराजवळ असलेल्या लोखंडी फाटकाजवळ गाठून त्यांना,” स्कुटी बाजूला घ्या” म्हणून कुरबुर करून त्याने थेट या महिलेवर आपल्या उजव्या हातात असलेले पिस्तुल रोखुन धरले मात्र या महिलेने सावधानता दाखवल्याने हवेत गोळीबार होऊन जीवावरचे बालट १७ जुलै २०१९ रोजी निभावले होते या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता मात्र कोपरगाव शहर पोलिसानी या आरोपीचा छडा लावला असून हा आरोपी कोपरगावातील असल्याचे निष्पन्न झाले असून आरोपी अक्षय खंडेराव जगताप रा.ओमनगर कोपरगाव यास जेरबंद केले आहे.

कोपरगाव शहरातील मध्यवस्तीत किशोर वाईन्स शॉप हे देशी दारूचे दुकान आहे.हे दुकान एक महिला चालवत आहे.त्या आपल्या दिवसभराचा गल्ला घेऊन घरी जर असताना एक अज्ञात आरोपी रस्त्यात त्यांना त्यांच्या गाडीजवळ येऊन म्हणाला की,”स्कुटी बाजूला घे,असे त्याने तीन वेळेला केले.त्यावेळी फिर्यादी महिला म्हणाली,” का बरे घेऊ”असे म्हणाली असता त्याने उजव्या हातात असलेले पिस्तूल त्यांच्यावर रोखले व आता फायर करणार असे फिर्यादीचे लक्षात आले असता त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या हाताला जोराचा धक्का बसला त्याने ते वर जाऊन गोळीबार झाला होता.मात्र यात या फिर्यादी महिलेची जीवित हानी सुदैवाने झाली नव्हती.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरातील मध्यवस्तीत किशोर वाईन्स शॉप हे देशी दारूचे दुकान आहे.हे दुकान एक महिला चालवत आहे.त्या आपल्या दिवसभराचा गल्ला घेऊन घरी जर असताना एक अज्ञात आरोपी रस्त्यात त्यांना त्यांच्या गाडीजवळ येऊन म्हणाला की,”स्कुटी बाजूला घे,असे त्याने तीन वेळेला केले.त्यावेळी फिर्यादी महिला म्हणाली,” का बरे घेऊ”असे म्हणाली असता त्याने उजव्या हातात असलेले पिस्तूल त्यांच्यावर रोखले व आता फायर करणार असे फिर्यादीचे लक्षात आले असता त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या हाताला जोराचा धक्का बसला त्याने ते वर जाऊन गोळीबार झाला होता.मात्र यात या फिर्यादी महिलेची जीवित हानी सुदैवाने झाली नव्हती.मात्र घटना स्थळावरून आरोपीने तात्काळ पोबारा केला होता त्या वेळी या किशोर वाईन्सच्या मालक असलेल्या महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा र.नं.२४८/२०१९ भा.द.वि.कलम ३०७,सह आर्म ऍक्ट ३/२५,२७ प्रमाणे दि.१८ जुलै २०१९ रोजी या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना सदरचा गुन्हा हा अक्षय खंडेराव जगताप यानेच केला असल्याचा गोपनीय सुगावा लागला होता.त्यांनी आरोपीचा शोध घेऊन त्यास जेरबंद करण्यासाठी पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार,अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे,उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला व त्यास ओमनगर येथून अटक केली आहे.पोलीस कोठडी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.व आपल्या ताब्यातील गावठी कट्टा काढून दिला आहे.या कामी त्यांना त्यांचे सहकारी पो.हे.कॉ.आर.पी.पुंड,ए. जी.अग्रवाल,जे.डी. गवारे.सचिन शेवाळे,ए. आर.वाघ आदींनी सहकार्य केले आहे.कोपरगाव पोलिसानी आरोपीला हुडकून काढून अटक केल्याने नागरीकांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close