जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..तर आठवीच्या पुढील वर्ग सुरु करा-यांची मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आगामी शाळा व महाविद्यालयीन शिक्षणाबाबत काय निर्णय घ्यावा या बाबत अनेक शिक्षण तज्ज्ञांचा संभ्रम झाला असून जगभर पसरलेल्या कोरोनाच्या भयंकर साथीबाबत मोठी भीती असल्याने हि जोखीम कोणी घ्यावी या बाबत एकमत दिसत नसल्याने आधी आठवीचे वर्ग चालू करून त्याचा अनुभव जमेत धरून मगच पुढील इयत्तांचा निर्णय घ्यावा असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे केले आहे.

कोरोना साथ सुरू असल्याने सुरक्षित अंतर पाळणे अवघड आहे.विद्यार्थ्यांना दाटीवाटीने बसवणे हि बाब या साथीची वाढ करण्यास कारणीभूत होऊ शकते.त्यातून अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु होऊ शकतात.काही दुर्घटना होऊ शकते.शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांचे जीवित महत्वाचे आहे.शिवाय नुकताच पावसाळा सुरु झाला आहे.पावसाळ्यात साथींचे आजार बळावू शकतात.मोठ्या संख्येने असलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतरामुळे जागा कमी पडू शकते.

राज्यात कोरोनाचा कहर झाला आहे.देशभरात कोरोना बाधितांचा दोन लाखांचा कधीच ओलांडला आहे.साथ अद्याप थांबण्याचे नाव घेत नाही.मृत्युदर कमी असला तरी या साथीचा धोका लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणावर असल्याने प्राथमिक शाळा,माध्यमिक शाळा,महाविद्यालये सुरु कशी आणि कधी सुरु करावी असा संभ्रम सरकार आणि शिक्षण तज्ञांमध्ये दिसून येत आहे.याची जोखीम घ्यायला कोणीही तयार नाही.याच्या चांगले वाईट परिणाम लगेच राज्यभर सामान्य जनतेत उमटू शकतात त्यामुळे राज्याची व देशाची निर्णय क्षमता गोठून गेली की काय ? असे म्हणावयास जागा निर्माण झाली आहे.त्यामुळे अद्याप शाळा सुरु करण्याबाबत निर्णय झालेला नाही.या पार्श्वभूमीवर कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी वाचा फोडली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की,कोरोना साथ सुरू असल्याने सुरक्षित अंतर पाळणे अवघड आहे.विद्यार्थ्यांना दाटीवाटीने बसवणे हि बाब या साथीची वाढ करण्यास कारणीभूत होऊ शकते.त्यातून अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु होऊ शकतात.काही दुर्घटना होऊ शकते.शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांचे जीवित महत्वाचे आहे.शिवाय नुकताच पावसाळा सुरु झाला आहे.पावसाळ्यात साथींचे आजार बळावू शकतात.मोठ्या संख्येने असलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतरामुळे जागा कमी पडू शकते.म्हणून आधी प्रयोग हणून केवळ आठवीच्या विद्यार्थ्यांची शाळा सुरु करून पुढे येणाऱ्या अनुभवावर पुढील निर्णय घेणे नक्कीच हितावह होणार आहे.असेही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close