कोपरगाव तालुका
साथीचे आजार संदर्भात प्रभावी नियंत्रण सुरु ठेवा-तहसीलदार चंद्रे

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोणा संसर्ग प्रादुर्भाव निर्मुलन व पावसाळा निगडित ईतर आजार संदर्भात कोपरगांव तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी व त्याचे सहकारी यांनी प्रभावी नियोजन करुन नियंत्रण ठेवावे असे आवाहन तहसिलदार योगेश चंद्रे यांनी बैठकीत केले आहे.कोरोणा संसर्ग प्रादुर्भाव निर्मुलन व पावसाळा निगडित ईतर आजार संदर्भात कोपरगांव तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी व त्याचे सहकारी यांची बैठक तहसिलदार यांचे दालनात संपन्न झाली आहे.यात कोरोणा संदर्भात संस्थात्मक विलगीकरण तसेच साथ आजार संदर्भात ग्रामीण पातळीवर प्रभावी नियोजन करणे संदर्भात सुचना दिल्या आहे.याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाटे,विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली आव्हाड(बडदे),डॉ.अनिकेत खोत,डॉ.विकास घोलप,डॉ.अजिंक्य आढाव,डॉ.नितीन बडदे,नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ.गायत्री कांडेकर उपस्थित होते.वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या सुचनांचे ग्राम समितीने काटेकोर पालन करावे.अशा सुचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहे.