कोपरगाव तालुका
..त्या ११ जणातील पाच जणांचे अहवाल आज आले
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव शहरातील एका शाळेत लिपिक म्हणून कार्यरत असलेले व लोणी ता.राहाता येथील मूळ रहिवासी असलेल्या इसमाचा कोरोना तपासणी अहवाल सकारात्मक आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील निकटवर्तीय असे एकुण ११ व्यक्तींची रवानगी आरोग्य विभागाने विलगीकरण कक्षात केली होती व त्यांच्या श्रावांची तपासणी करण्यात आली होती.त्यांच्या पैकी आज पाच जणांचे अहवाल निरंक आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.त्यामुळे प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
राहाता तालुक्यात रुग्ण संख्येत निमगाव येथे एक भाजीपाला व्यापारी महिला आढळली होती.तिच्या संपर्कात आलेल्या अनेक रुग्णांना तपासणीसाठी ताब्यात घेतले होते.या अकरा जणांना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते,अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ.वैशाली बडदे,डॉ.कृष्णा फुलसुंदर यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.या पाच जणांचे अहवाल नकारात्मक आले आहे. या आधी बोधेगाव येथील नऊ जण ताब्यात घेतले होते मात्र त्यांचे अहवाल नुकतेच नकारात्मक आल्याने तालुका प्रशासन व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.