कोपरगाव तालुका
पावसामुळे जेऊर कुंभारी येथील फुलशेतीचे नुकसान

संपादक-नानासाहेब जवरे
धारणगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील शेतकरी भानुदास शामराव वक्ते यांच्या फुलशेतीचे काल रात्री झालेल्या वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन याच परीसरातील सुनिल वक्ते व राजेंद्र वक्ते यांचा सह इतर फुलबागांचेही नुकसान झाल्याची माहिती भानुदास वक्ते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
कोरानामुळे सर्व धार्मिक स्थळे तसेच सर्व धार्मिक कार्यक्रम व उत्सव बंद असल्यामुळे फुलांना मागणी नाही तसेच फुलांची सर्वात मोठी बाजारपेठ शिर्डी देवस्थान गेल्या दोन-तिन महिन्या पासुन बंद असल्यामुळे फुलबाग व्यवसायाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे दुष्काळात तेराव्या महीण्याचा दाहक अनुभव ते करीत आहेत. काल रात्रीच्या निसर्ग चक्रिवादळतील वारा व पावसामुळे फुलझाडांची मोडतोड होउन ती भुईसपाट झाली आहे.
जेउर कुंभारी परीसरातील शेतकरीआपल्या शेतीमध्ये ठिबंक सिंचन तंत्राचा वापर करून झेंडू,बिजली व गलांडा हे पिक घेत असतात.गेल्या ३० वर्षे पासुन भानुदास वक्ते व त्यांचे बंधु हे फुल शेतीचा व्यवसाय करतात. त्यांचा शेतातील झेंडु,गलांडा व बिजली या फुलांना शिर्डी व कोपरगावत खुप मागणी आहे आपल्या शेतातुन दररोज १०० किलो फुले याप्रमाणे दरमहा ५० हजार ते ६० हजार रूपयांचे उत्पन्न मिळवतात. यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. परंतु कोरानामुळे सर्व धार्मिक स्थळे तसेच सर्व धार्मिक कार्यक्रम व उत्सव बंद असल्यामुळे फुलांना मागणी नाही तसेच फुलांची सर्वात मोठी बाजारपेठ शिर्डी देवस्थान गेल्या दोन-तिन महिन्या पासुन बंद असल्यामुळे फुलबाग व्यवसायाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे दुष्काळात तेराव्या महीण्याचा दाहक अनुभव ते करीत आहेत. काल रात्रीच्या निसर्ग चक्रिवादळतील वारा व पावसामुळे फुलझाडांची मोडतोड होउन ती भुईसपाट झाली आहे त्यामुळे फुलबाग शेतकऱ्याचे मोठे प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.इतर पिकांना विमा व आर्थिक मदत दिली जाते त्याच प्रमाणे फुल शेतीकडे शासनाने लक्ष दिले पाहीजे.अशी मागणी फुलबाग शेतकऱ्यांनी केली आहे .