कोपरगाव तालुका
कोपरगावात पावसाने झाले मोठे नुकसान !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात काल आलेल्या वादळाबरोबर झालेल्या पावसाचे आकडे हाती आले असून कोपरगाव शहर व परिसरात ४९ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे.तर त्या खालोखाल पोहेगाव मंडळात ४५,सुरेगाव येथे ४३,तर दहिगाव बोलका मंडळात ३२ मी.मी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती कोपरगाव तहसील कार्यालयाने दिली आहे.दरम्यान या वादळाने देर्डे-कोऱ्हाळें ग्रामपंचायत हद्दीत श्री गवळी यांचे ३ पॉली हाउस,तर माहेगाव देशमुख येथे एक पॉली हाऊस,मढी खुर्द येथे श्री आभाळे यांच्या ३ शेडनेट,तर पोहेगाव येथे एक श्री वाके यांचे शेड नेट आदींचे मोठे नुकसान झाले आहे,तर तालुक्यात तीन पक्क्या घरांचे तर १० कच्च्या घरांचे शत प्रतिशत नुकसान झाले आहे,तर २१ घरांचे अंशतःतर एका झोपडीचे नुकसान झाले आहे.तर कृषी क्षेत्राचे ४.२ इतक्या अल्पनुकसान झाले आहे.तर एक जनावर दगावले असल्याची अधिकृत माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान पावसाळ्यापूर्वीच गोदावरी नदीत पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे गोदावरी नदी पात्रात जलसंपदा विभागाने सुमारे १६ हजार क्युसेकने पाणी सोडले आहे.त्याचा फायदा खरीप उभारणीस शेतकऱ्यांना होणार। असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोरोनाचा कहर सुरु असतानाच चक्री वादळाचे तांडव भारतात दाखल झाले आहे.त्यामुळे सर्वच सरकारांनी जनतेला सावध केल्याने जीवित अथवा वित्तीय हानी वाचविण्यात शासनाला यश आले आहे.वादळ आता उत्तर नगर जिल्ह्यातून परागंदा झाले आहे.या पावसाने खरीप हंगाम पूर्व मशागत होण्यास मदत होणार आहे.या पावसाचा भूजल पातळी वाढण्यास फारसा फायदा होणार नाही.मात्र धरण पाणलोट क्षेत्रातील नाशिक क्षेत्रात १३७ ते १४३ मी.मी पाऊस झाला आहे.दरम्यान उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेपासून मात्र जीवश्रुष्टीची सुटका मात्र झाली आहे.अखेरचा उष्मा जीवघेणा ठरला होता.पावसाने या वेळी वेळेपूर्वी जोरदार सलामी दिल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.दरम्यान पावसाळ्यापूर्वीच गोदावरी नदीत पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे गोदावरी नदी पात्रात जलसंपदा विभागाने सुमारे १६ हजार क्युसेकने पाणी सोडले आहे.त्याचा फायदा खरीप उभारणीस शेतकऱ्यांना होणार। असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.