जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

अपघातात महिलेचे निधन,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आत्मा मलिक हॉस्पिटल समोर असलेल्या नगर-मनमाड महामार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक साठ वर्षीय अज्ञात महिला जागेवरच ठार झाली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खबर देणार कार चालक अमित खोकले (वय-३०) रा.गांधीनगर कोपरगाव यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कोरोना साथीची टाळेबंदी सरकारने बऱ्याच अंशी उठवली आहे.त्यामुळे आता वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.त्यामुळे रस्त्यावर आता अवजड वाहतुकीसह अन्य वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.पर्यायाने अपघातांचा कमी झालेला आलेख आता पुन्हा वाढू लागला आहे.नगर-मनमाड हा महामार्गही त्याला अपवाद नाही.या मार्गावरही आता मोठ्या संख्येने वाहतूक वाढली आहे.दि.१ जून रोजी सकाळी सात वाजेच्या आत एक अज्ञात महिला आत्मा मलिक हॉस्पिटल समोरील रस्त्यावर मृत अवस्थेत आढळून आली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी आपल्या दप्तरी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हि साठ वर्षीय महिला मयत झाली असल्याचे म्हटले आहे.त्यांनी या प्रकरणी खबर देणार अमित साहेबराव खोकले यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद क्रं.२१/२०२०अन्वये केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.दत्तात्रय तिकोणे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close