कोपरगाव तालुका
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५० हजारांची मदत

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी येथील रहिवासी असलेले शेखर चव्हाण यांना शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५० हजार रुपये मदतीचे मंजुरी पत्र आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते रुग्णांचे चुलते नवनाथ चव्हाण यांना नुकतेच दिले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेखर चव्हाण मागील काही वर्षापासून असाध्य आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागेल असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या नासिक येथील डॉक्टरांनी सांगितले होते.चव्हाण यांना या शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च येणार आहे मात्र एवढा मोठा खर्च करण्याची त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी आ.काळे यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी विनंती केली होती. त्याची त्यांनी तातडीने दखल घेत पाठपुरावा करून चव्हाण यांना ५० हजार रुपयांची मदत मिळवून दिली आहे.या बद्दल त्यांनी आ. काळे यांचे आभार मानले आहे.