जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

आ. काळे यांनी केली समृद्धी महामार्गाची पाहाणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच समृद्धी महामार्गाचे तालुक्यात सुरू असलेल्या कामाची पाहणी केली व या कामामुळे निर्माण झालेल्या विविध अडचणींचा आढावा घेतला आहे.

समृद्धी महामार्गाच्या कामामुळे पडलेले विजेचे खांब उभे करून द्यावे,विजवाहक तारांच्या रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणी जमिनीखालून केबल टाकाव्या.दुसऱ्या जागी हलवण्याची गरज असलेले विजेचे खांब लवकरात लवकर हलवून वीजपुरवठा सुरळीत करावा व जीवितहानी होणार नाही याची काळजी घ्यावी.बुजल्या गेलेल्या ज्या चाऱ्यांची नोंद केलेली नाही त्या चाऱ्यांची नोंद करावी व त्यांचे दुरुस्ती काम करून द्यावे,महामार्ग चौफुलीवर जमिनीखालील केबालचा वापर करावा-आ. काळे

राज्यसरकारने भाजपच्या कालखंडात एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून या ५६ हजार कोटी रुपयांच्या या ७१० कि.मी. महामार्गाची घोषणा केली त्याला मोठा आटापिटा केला असताना ऑक्टोबर २०१० च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने त्यांना आस्मान दाखवल्याने हात चोळत बसावे लागले मात्र नंतर महाआघाडीचे सरकार सत्तेत आले असले तरी केंद्र सरकारची गैरमर्जी परवडणारी नाही म्हणून या प्रकल्पाचा अकारण खेळ करण्याचे महाआघाडीने टाळले आहे.त्यामागे अर्थातच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे आहे हे सांगण्यास कोण ज्योतिषाची गरज नाही.हे काम अन्यत्र जोराने चालू असले तरी कोपरगाव तालुक्यात मात्र याची गती अत्यंत धीमी आहे.अन्यत्र हीच कामे अंतिम हात मारण्यापर्यंत पोहचली आहेत.त्यातच काही दिवसांपूर्वी जेऊर-कुंभारी शिवारात खाली महावितरण कंपनीच्या खाली आलेल्या विद्युत वाहक तारांनीं दोन अल्पवयीन मुलींचा या ठेकेदारांच्या बेपर्वाईमुळे बळी घेतला आहे.त्यामुळे आ. काळे यांच्या या दौऱ्याने यात काय बदल होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले तर नवल नाही.या पार्श्वभूमीवर हा दौरा झाला आहे.

या वेळी आ. काळे यांनी समृद्धी महामार्गाच्या कामामुळे पडलेले विजेचे खांब उभे करून द्यावे,विजवाहक तारांच्या रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणी जमिनीखालून केबल टाकाव्या.दुसऱ्या जागी हलवण्याची गरज असलेले विजेचे खांब लवकरात लवकर हलवून वीजपुरवठा सुरळीत करावा व जीवितहानी होणार नाही याची काळजी घ्यावी.बुजल्या गेलेल्या ज्या चाऱ्यांची नोंद केलेली नाही त्या चाऱ्यांची नोंद करावी व त्यांचे दुरुस्ती काम करून द्यावे,महामार्ग चौफुलीवर जमिनीखालील केबालचा वापर करावा.काम सुरू झाल्यानंतर महामार्गाच्या कामामुळे बाधित झालेल्या ज्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही त्या सर्व बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोबदला देण्यात यावा.दगड फोडण्यासाठी उडविण्यात येणाऱ्या स्फोटातील दगडांमुळे कोणाचेही नुकसान होऊ नये यासाठी काळजी घेऊन काम करावे आदी सूचना यावेळी त्यांनी वीज वितरण कंपनी,पाटबंधारे विभाग व समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या गायत्री कन्स्ट्रक्शनचे ताताराव डुंगा यांना दिल्या आहेत.तसेच अडचणीच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच महावितरण कंपनी,पाटबंधारे विभाग व समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या गायत्री कन्स्ट्रक्शनच्या अधिकाऱ्यांची लवकरच एकत्रित बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक, बाधित शेतकरी व ग्रामस्थ सुरक्षित अंतर पाळुन उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close