कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्याबाहेरून आले मोठ्या प्रमाणावर नागरिक
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जगभर कोरोनाचा कहर सुरु असताना राज्याबाहेरून व तालुक्याबाहेरून कोपरगाव तालुक्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या अद्याप कमी झालेली नाही.आज पर्यंत तालुक्यात देश,राज्य,जिल्हा,व तालुक्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या २० हजार ४१४ वर पोहचली आहे.आलेल्या नागरीकांपैकी ०१ हजार ६४७ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत तर ०१ हजार ०६० जणांचे संस्थात्मक विलगीकरण पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
कोपरगाव तालुक्यात एकूण-१० हजार ६५६ व्यक्ती आल्या आहेत.यामध्ये जिल्हयाबाहेरील-९३७८,राज्याच्या बाहेरुन-३००,देशाबाहेरुन-८० व्यक्ती आल्या आहेत. १ मे नंतर आलेल्या व्यक्तिंना आता संस्थात्मक विलगीकरण केले जात आहे.यानुसार आज अखेर तालुक्यात १६४७ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.०१ हजार ०६० जणांनी संस्थात्मक विलगीकरण पुर्ण केले आहे.जनतेने आपल्या जवळपास कोणी बाहेरगावहुन व्यक्ती आल्यास आरोग्य विभागास तत्काळ माहिती द्यावी-डॉ.संतोष विधाते
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ८८१ ने वाढून ती २ लाख ०८ हजार ०७२ इतकी झाली असून ५ हजार ८२९ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ७२ हजार ३०० वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने २ हजार ४६५ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या १४१ वर जाऊन पोहचली आहे तर सात जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.दिल्ली,मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव,संगमनेर हि कोरोनाची केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी पाचव्यांदा वाढवून ३० जून पर्यंत केली आहे.कोपरगावात १० एप्रिल नंतर दुसरा रुग्ण आढळला नाही.यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे.या पार्श्वभूमीवर त्यांनी हि माहिती दिली आहे.
कोपरगाव तालुक्यातुन आज अखेर ७९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.यापैकी ७३ जणांना सिव्हिल हॉस्पिटल नगर येथे पाठवले होते.तेथे त्यांची कोरोनाबाबत तपासणी केली आहे.आता कोपरगाव श्री सद्गुरू गंगागिरी महाराज मुलींचे वसतिगृह येथे कोरोना केअर सेंटर मधे श्राव घेण्याची सोय झाल्यामुळे सहा जणांचे श्राव कोपरगाव येथे घेतले आहेत.हे सहाही श्राव तपासणी अहवाल नकारात्मक आले आहेत. दिनांक १० एप्रिल नंतर कोपरगाव तालुक्यात एकही बाधित रूग्ण आढळलेला नाही-डॉ.कृष्णा फुलसुंदर
त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आताही राहाता तालुक्यातील संपर्कातील पाचही रुगणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत.कोपरगावसाठी ही समाधानाची बाब आहे.आज आपण चोहोबाजूंनी कोरोना बाधित रूग्ण असणार्या तालुक्यांनी घेरले गेलो आहोत.यामागे आशा,आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी यांचा क्षेत्रस्तरावर फार मोलाचा वाटा आहे.तहसिलदार योगेश चंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली प्रशासनाचे आरोग्य,नगरपालिका,पंचायत समिती,पोलिस सर्व विभागाने काटेकोर नियोजन केले आहे.आ.आशुतोष काळे,नगराध्यक्ष विजय वहाडणे,सभापती पोर्णिमा जगघने,उपसभापती अर्जुन काळे,सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व पंचायत समिती सदस्य,पालिकेचे सर्व नगरसेवक,सर्व पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आणि पत्रकार आदींचे यामध्ये सहकार्य लाभले आहे.नागरिकांनी या साथींपासून संवक्षण करण्यासाठी तोंडाला रुमाल बांधावा.सुरक्षित अंतराचे पालन करावे.घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्या.घरात खेळती हवा ठेवावी.कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य ठीकठाक रहावे म्हणून कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,पोलिस निरीक्षक अनिल कटके आणि राकेश मानगावकर,ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर,विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे यांची मोठी मेहनत असल्याचेही शेवटी सांगितले आहे.