कोपरगाव तालुका
शांताराम रणशूर यांना मातृशोक
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील समता सैनिक दलाचे जिल्हा प्रमुख तथा दि.बुध्दिष्ट सोसायटी आँफ इंडिया महाराष्ट्र राज्याचे संपर्क प्रमुख शांताराम रणशूर यांच्या मातोश्री काश्याबाई रखमाजी रणशूर (वय-९०)यांचे नुकतेच निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात २ मुले,६ मुली, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.आंबेडकरी व धम्म चळवळीत त्यांचे योगदान मोठे होते त्यांनी नेहमी आपल्या आयुष्यामध्ये नातेवाइकांसह इतरांना मदत करण्याचे काम केले आहे.स्वभावाने गुणवान असणाऱ्या काश्याबाईनी आपले कुटुंब सुशिक्षित करुन योग्य स्तरावर नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला.त्यांच्या निधनाने संवत्सर ,भिमवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असुन माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव भारूड यांच्या चूलत बहिण होत्या.