जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील आणखी अकरा जण विलगीकरण कक्षात !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव शहरातील एका शाळेत लिपिक म्हणून कार्यरत असलेले व लोणी ता.राहाता येथील मूळ रहिवासी असलेल्या इसमाचा कोरोना तपासणी अहवाल सकारात्मक आला आहे.त्यामुळे सतर्कता म्हणून त्यांचे शाळेतील व संपर्कातील निकटवर्तीय असे एकुण ११ व्यक्तींची रवानगी विलगीकरण कक्षात केली आहे. त्यांचे वर पुढील चाचपणी सुरु केली आहे.नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.

हा रुग्ण सध्या कोपरगावात नसल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.राहाता तालुक्यात रुग्ण संख्येत निमगाव येथे एक भाजीपाला व्यापारी महिला आढळली होती.तिच्या संपर्कात आलेल्या अनेक रुग्णांना तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे.या अकरा जणांना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते,अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ.वैशाली बडदे,डॉ.कृष्णा फुलसुंदर यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. बोधेगाव येथील नऊ जण ताब्यात घेतले होते मात्र त्यांचे अहवाल आजच नकारात्मक आल्याने तालुका प्रशासन व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close