जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात दोघांचा अकस्मात मृत्यू

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत हद्दीतील जेष्ठ महिला अलका रमेश बिरारी (वय-६२) यांना आपल्या राहत्या घरी अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांना स्थानिक वैद्यकांकडे दाखविण्यात आले मात्र परिस्थिती गंभीर असल्याने त्यांनी त्यांना अन्यत्र उपचारार्थ दाखल करण्याचा सल्ला दिला होता. या नंतर या रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांना नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचार चालू असताना त्यांनी त्या उपचाराला प्रतिसाद दिला नाही त्यात त्यांचे दोन महिन्यांपूर्वी (२८ मार्च) रोजी या महिलेचे निधन झाले होते मात्र या बाबत पोलीस ठाण्यात उशिरा नोंद केली आहे.तर दुसऱ्या घटनेत कोपरगाव रेल्वे स्थानका नजीक एका सुमारे पस्तीस ते चाळीस वयाच्या इसमाचा मृतदेह आज सकाळी रेल्वे पोलिसांना आढळून आला आहे.त्यामुळे या बाबत उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे.

या घटनेची आधी नाशिक येथील इंदिरानगर येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू दप्तरात नोंद करून नंतर ती कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात २६/२०२० सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे दाखल करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.चंद्रकांत तोर्वेकर हे करीत आहेत.दरम्यान आज सकाळी कोपरगाव रेल्वे स्थानका नजीक एका चाळीस वर्षीय इसमाचा मृत देह आढळून आला आहे.त्याच्या अंगात लाल-निळा पट्याचा टी शर्ट आहे.रुमाल मुखपट्टीसाठी वापरण्यात आलेला दिसतो मात्र तो गळ्यात निघालेल्या स्थितीत दिसत आहे.या कमी रेल्वे पोलिसानी अकस्मात मुत्युची नोंद केली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close