जाहिरात-9423439946
अपघात

अज्ञात वाहनाच्या धडकेत,एक ठार,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील नगर-मनमाड रस्त्यावरील गोदावरी नदीवरील मोठ्या पुलावर असताना सुनील बन्सी पवार (वय-४८) रा.जुन्नर जि.पुणे यास अज्ञात वहानाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी होऊन त्यात त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे.या प्रकरणी त्यांच्या भगिनी मंदा बळीराम आहेर (वय-४०) रा.मनाई वस्ती संवत्सर यांनी अज्ञात वाहनांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मयत इसम सुनील पवार हा दि.२९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास फिरत गेला असता त्या ठिकाणी त्यास अज्ञात वाहनाने धडक दिली आहे.त्यात तो गंभीर जखमी झाला होता.त्यास जवळच्या नागरिकांनी रुग्णवाहिका बोलवून त्यास उपचारार्थ भरती केले असता तो उपचारादरम्यान मृत्यू पावला आहे.


 
   वर्तमानात सावळीविहिर-इंदोर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे.बऱ्याच ठिकाणी वाहतूक एकेरी केली असल्याने व सदर रस्ता नादुरुस्त असल्याने अपघातात वाढ झाली आहे.अशीच घटना नुकतीच अ.नगर-मनमाड रस्त्यावर गोदावरी नदीवर असलेल्या मोठ्या पुलावर घडली आहे.मनाई वस्ती येथे फिर्यादी महिला राहत असून तीच्याकडे तिचा भाऊ राहत होता. कधी तो जुन्नर येथील त्यांचे नातेवाईक तर कधी आपल्या बहिणीकडे रहात असताना तो दि.२९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास फिरत गेला असता त्या ठिकाणी त्यास अज्ञात वाहनाने धडक दिली आहे.त्यात तो गंभीर जखमी झाला होता.त्यास जवळच्या नागरिकांनी रुग्णवाहिका बोलवून त्यास उपचारार्थ भरती केले असता तो उपचारादरम्यान मृत्यू पावला आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी महिलेने अज्ञात चालका विरुद्ध उशीराने गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी फिर्यादी महिला मंदा आहेर यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा क्रं. ५४/२०२४ भा.द.वि.कलम   दाखल केला आहे.त्यामुळे अज्ञात वाहनाविरुद्ध ग्रामस्थांत संतापाचे वातावरण पसरले आहे.

  दरम्यान या प्रकरणी पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close