जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

जमावबंदीचे उल्लंघन,शहर पोलिसांची तिघांवर कारवाई

जाहिरात-9423439946

संपादक-नांनासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात नागरिकांच्या जीविताला धोका उत्पन्न निर्माण होईल असे वर्तन विनाकारण गर्दी केल्याच्या कारणावरून कोपरगाव शहर पोलिसानी महात्मा गांधी चौक व तहसील कार्यालया नजिक आरोपी तरुण अण्णासाहेब नामदेव जाधव (वय-६४ ) व पवन अण्णासाहेब जाधव (वय-२०) तसेच पंकज पोपटराव दळवी (वय-३५) यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आज दुपारच्या सुमारास गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

या आधीच कोपरगाव तालुक्यात कोरोना साथीचे दोन बळी गेले आहे.तरीही काही तरुण व नागरिक या बाबतीत गंभीर व्हायला तयार नाही हि अत्यंत दुखदायी घटना मानावी लागेल.तालुका प्रशासन व शहर पोलीस आपल्या जीवाचे रान करून शहरातील नागरिकांची काळजी घेता असताना मोठ्या संख्येने नागरिकांनी सहकार्य केल्याने कोरोना साथ नियंत्रणात आली असताना आता पुन्हा रुग्ण निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे मात्र काही तरुण या बाबत अद्याप गंभीर व्हायला तयार दिसत नाही.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ७१८ ने वाढून ती ७५ हजार ०४८ इतकी झाली असून २४४० जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या २४ हजार ४२७ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ९२१ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ६४ वर जाऊन पोहचली आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव व येवला हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून १७ मे पर्यंत केली आहे.या आधीच कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.तरीही काही तरुण व नागरिक या बाबतीत गंभीर व्हायला तयार नाही हि अत्यंत दुखदायी घटना मानावी लागेल.तालुका प्रशासन व शहर पोलीस आपल्या जीवाचे रान करून शहरातील नागरिकांची काळजी घेता असताना मोठ्या संख्येने नागरिकांनी सहकार्य केल्याने कोरोना साथ नियंत्रणात आली असताना आता पुन्हा रुग्ण निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे मात्र काही तरुण या बाबत अद्याप गंभीर व्हायला तयार दिसत नाही.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसानी आपला खाक्या दाखवत आरोपी तरुण अण्णासाहेब नामदेव जाधव (वय-६४ ) व पवन अण्णासाहेब जाधव (वय-२०) तसेच पंकज पोपटराव दळवी (वय-३५) या तिघांविरोधात तरुणाविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.१६३/२०२० व १६६/२०२० भा.द.वि.कलम १८८(२),२६९,२७०,२९० प्रमाणे फिर्यादी पो.कॉ.अंबादास रामनाथ वाघ (वय-२९ ) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.बी.एस.कोरेकर हे करीत आहेत.या आधीही कोपरगाव पोलिसानी अनेक प्रतिष्ठीतांविरुद्ध कारवाई करून दणका दिला आहे त्यात आता या तीन इसमांच्या कारवाईची भर पडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close