कोपरगाव तालुका
अल्पवयीन मुलीचे लग्न, लग्नाआधीच ठोकल्या बेड्या !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या दुष्काळी खोल्यात असलेले रहिवाशी नारायण आगाजी आव्हाने व त्यांची पत्नी अलकाबाई नारायण आव्हाने यांनी आपली अल्पवयीन मुलीचे लग्न मढी येथील विकास सोपान चव्हाण यांचेशी ठरवून ते लावण्याच्या सुमारास या बाबतचा सुगावा कोपरगाव शहर पोलिसांना लागल्याने पोलिसानी तत्परतेने कारवाई करून हा विवाह रोखला असून वरील मुलीचे माता-पिता यांचेसह वरील मुलगा विकास चव्हाण,त्याची आई सुलोचना सोपान चव्हाण,वडील सोपान आनंदा चव्हाण यांचेवर बाल प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली आहे.त्यामुळे जेऊर पाटोदा परिसरात खळबळ उडाली आहे.
बालविवाह झालेल्या मुलींचा लैंगिक विकास पुरेसा झालेला नसतो.अशा स्थितीत १८ वर्ष गाठायच्या आतच त्यांना गर्भधारणा झाली तर बाळाच्या पोषणासाठी अजिबातच सक्षम नसलेले शरीर,घरातल्या कामाचे ओझे आणि त्यातच अपुरे पोषण.या सार्यांचे वाईट परिणाम त्या बाळाच्या आरोग्यावर झाल्याखेरीज राहात नाहीत.लहान वयात लग्न झाल्यामुळे आपल्या लैंगिकतेविषयी पुरेसे ज्ञान या मुलींना नसते.या बाबी मुळे या २००६ च्या कायद्याने बालविवाह घडवून आणणे, तत्संबंधित सर्व सोहळे व इतर गोष्टीवर प्रतिबंध घातला आहे.
लग्न लागायच्या वेळी जर वधू किंवा वर यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो. भारतात वधूचे वय १८ आणि वराचे २१ पेक्षा कमी असू नये असे कायदा सांगतो. काही समाजात मूल जन्माला यायच्या आधीच त्याचे आपल्या नात्यात लग्न ठरवून टाकले जाते,तशा शपथा जातीच्या पंचांसमोर घेतल्या जातात.बालविवाह झालेल्या मुलींचा लैंगिक विकास पुरेसा झालेला नसतो.अशा स्थितीत १८ वर्ष गाठायच्या आतच त्यांना गर्भधारणा झाली तर बाळाच्या पोषणासाठी अजिबातच सक्षम नसलेले शरीर,घरातल्या कामाचे ओझे आणि त्यातच अपुरे पोषण.या सार्यांचे वाईट परिणाम त्या बाळाच्या आरोग्यावर झाल्याखेरीज राहात नाहीत.लहान वयात लग्न झाल्यामुळे आपल्या लैंगिकतेविषयी पुरेसे ज्ञान या मुलींना नसते.या बाबी मुळे या २००६ च्या कायद्याने बालविवाह घडवून आणणे, तत्संबंधित सर्व सोहळे व इतर गोष्टीवर प्रतिबंध घातला आहे. विवाहासाठी कायदेशीर वय मुलीसाठी किमान १८ वर्षे,व मुलांसाठी २१ किमान वयो मर्यादा कायद्याने ठरवून दिली आहे.त्या पेक्षा कमी वय असणाऱ्या तरुण तरुणीचा विवाह हा कायदेशीर समजला जात नाही.जेऊर पाटोदा ग्रामपंचायत हद्दीत कोपरगाव शहर पोलिसांना एका खबऱ्याने दिलेल्या खबरीमुळे या विवाहाचा तपास लागला व पोलिसानी तातडीने सूत्रे हालविल्याने हा अनर्थ टळला आहे.कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी वरील पाच आरोपीविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु .र.न.१६४/२०२० बाळ विवाह प्रतिबंधक कायदा कलम ९,१०,११ भा.द.वि.कायदा कलम ५११ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस,जी.ससाणे हे करीत आहेत.