जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

मंजूर येथे विहिरीत महिलेचे प्रेत,तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मंजूर वडाचीवाडी येथे रहिवाशी असलेली विवाहित महिला जयश्री गोरक्षनाथ गावंड (वय-२९ ) हि त्यांच्याच विहिरीत मृत अवस्थेत आढळल्या नंतर तीला वर काढल्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नवरा गोरक्षनाथ बाळासाहेब गावंड,सासरा बाळासाहेब कारभारी गावंड,सासू लहानबाई बाळासाहेब गावंड या तिघा विरोधात आत्मत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात मृत महिलेचा पिता विलास लक्ष्मण शिंदे (वय-५२ ) रा.जवळके यांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसानी या तिन्ही आरोपींना तात्काळ अटक केली आहे.

मयत महिला जयश्री विलास शिंदे यांचा विवाह साधारण बारा वर्षांपूर्वी मंजूर वडाचीवाडी या ठिकाणी असलेला आरोपी व मयत महिलेचा नवरा गोरक्षनाथ बाळासाहेब गावंड या तरुणाबरोबर थाटामाटात लावून दिला होता.सुरुवातीचे नव्या नवलाईचे नऊ दिवस गेल्या नंतर त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्य झाले होते.दरम्यान काही दिवसांपूर्वी नवरा,सासू,सासरे यांनी किरकोळ कारणावरून मयत महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली होती.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,मयत महिला जयश्री विलास शिंदे यांचा विवाह साधारण बारा वर्षांपूर्वी मंजूर वडाचीवाडी या ठिकाणी असलेला आरोपी व मयत महिलेचा नवरा गोरक्षनाथ बाळासाहेब गावंड या तरुणाबरोबर थाटामाटात लावून दिला होता.सुरुवातीचे नव्या नवलाईचे नऊ दिवस गेल्या नंतर त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्य झाले होते.दरम्यान काही दिवसांपूर्वी नवरा,सासू,सासरे यांनी किरकोळ कारणावरून मयत महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली होती.त्यानंतर एकदा गंभीर स्वरूपाची मारहाण झाल्यावर मयत महिलेच्या वडिलांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अदखल प्राप्त गुन्हा दाखल केला होता.मात्र त्यांना एकत्र बोलावून अधिकाऱ्यानी लेखी समज देऊन पुन्हा समजोता घडवून आणला होता.जानेवारी महिन्यांत नांदण्यासाठी सासरी पाठवले होते.मात्र आज दुपारी दोनच्या सुमारास मयत महिलेच्या बहिणीला आरोपीनी दूरध्वनी करून याबाबत घटनेची माहिती देऊन त्यांनी ती मयत महिलेच्या पित्यास दिली.त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याची खबर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यास दिली.पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी घटनास्थळी धाव घेऊन मयत महिलेचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात तत्काळ हलविले व आरोपीना अटक करून कोपरगाव येथे रवाना केले असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधीकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शखाली पोलीस निरीक्षक अनिल कटके हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close