कोपरगाव तालुका
कोरोनाची नागरीकांनी दक्षता घ्यावी-आ. काळे
संपादक-नानासाहेब जवरेधारणगाव-(प्रतिनिधी)कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथे स्थानिक पातळीवर होत असलेल्या उपाययोजनांची माहीती घेण्यासाठी नुकतीच आ. काळे यांनी आढावा बैठक घेतली आहे.
या बैठकीत आ. काळे यांनी मागील दोन महीन्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने स्थानिक पातळीवर केलेल्या कामाची माहीती घेतली. तसेच गावातील नागरीकांची आरोग्य तपासणी करण्याबाबतच्या महत्वाच्या सुचना आ. काळे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना यावेळी दिल्या.कोपरगाव शेजारील येवला तालुक्यात कोरोनाने धुमाकुळ घातला असुन आज नव्याने ६ कोराना बाधितांची नोंद झाली असुन एुकुण संख्या आता ३१ झाली आहे. कोपरगावकरांसाठी हि धोक्याची घंटा असुन या घटनेच गांभिर्य लक्षात घेउन प्रशासनाकडुन नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.याबाबतीत गावातीला दक्षता समितीने सतर्क राहुन उपाययोजना कराव्या तसेच बाहेरून गावात येणाऱ्याची आरोग्य तपासणी करूनच गावात प्रवेश द्यावा रेशन वाट्पाच्या वेळी सुरक्षित अंतराचे पालन होइल याची काळजी घ्यावी तसेच . नागरीकांनी संकटकाळात योग्य ती खबरदारी घेण्याच्या सुचना आ.काळे यांनी या वेळी दिल्या.या प्रसंगी संरपंच नानासाहेब चौधरी, उपसरपंच गोरख चौधरी. गौतम बॅकचे संचालक साहेबलाल शेख, यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, पोलिस पाटील, रेशन दुकानदार पहाडे, ग्रामसेविका पुनम आहिरे आरोग्य सेवक डॉ.राजेंद्र खरे, डॉ पाटिल, रावसाहेब चौधरी, ग्रा.पं कर्मचारी नानासाहेब चौधरी यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.