कोपरगाव तालुका
अरविंद ससाणे यांचे निधन
संपादक-नानासाहेब जवरे
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथिल रहिवाशी,शेतकरी व महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन ट्रस्टचे माजी विश्वस्त अरविंद ससाणे (वय-७५) यांचे नुकतेच राहत्या घरी निधन झाले आहे.त्यांच्यावर संवत्सर गोदावरी काठी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,मुलगा,मुलगी,नातवंडे असा परिवार आहे.ते गत दोन महिन्या पासून गुडघे दुखीमुळे त्रस्त होते.त्यांच्या निधनाने संवत्सर व कोपरगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
कै. अरविंद ससाणे हे संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे दोन वेळा संचालक,कोपरगाव तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष,साई संजीवनी पतसंस्थेचे माजी संचालक तसेच संवत्सर येथील बिग बागायतदार विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष हॊते.ते कर्मवीर काळे सहकारी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कै. शिवाजीराव ससाणे यांचे कनिष्ठ बंधू होते.त्यांनी माजी मंत्री शंकरराव कोल्हे व नामदेवराव परजणे यांच्या संघर्षात परजने यांची बाजू १९९७ साली बाजू घेतली होती.त्यांच्या निधनाने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,संवत्सर येथील जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे,माजी उपसरपंच विवेक परजणे, कृष्णराव परजणे आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.