जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या गावात अवैध वाळू उपसा,५.५० लाखांचा ऐवज जप्त

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सोनारी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करण्यास प्रतिबंध असतानाही महिंद्रा कंपनीचा एक विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर रात्रीच्या सुमारास दीड वाजता वाळूचोरी करताना आढळून आला आहे.या प्रकरणी कामगार तलाठी धनंजय गुलाबराव पऱ्हाड (वय-३३) रा.रिद्धीसिद्धिनगर कोपरगाव यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

एक महिंद्रा कंपनीचा विनाक्रमांकाचा ट्रॅक्टरचा आरोपी हा विनापरवाना अवैधपणे वाळूचोरी करत असल्याची गुप्त खबर महसूल विभागाला मिळाली होती.त्यानुसार कामगार तलाठी धनंजय पऱ्हाड यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी छापा घातला असता त्यांना तेथे एक विना क्रमांकाचा तांबड्या रंगाचा महिंद्रा ट्रॅक्टर आपल्या विनाक्रमांकाचा ट्रेलर मध्ये वाळू वाहतूक करताना आढळून आला आहे.

कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळूचोरी करण्यास जिल्हाधिकाऱ्यानी प्रतिबंध घातलेला असतानाही एक महिंद्रा कंपनीचा विनाक्रमांकाचा ट्रॅक्टरचा आरोपी हा विनापरवाना अवैधपणे वाळूचोरी करत असल्याची गुप्त खबर महसूल विभागाला मिळाली होती.त्यानुसार कामगार तलाठी धनंजय पऱ्हाड यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी छापा घातला असता त्यांना तेथे एक विना क्रमांकाचा तांबड्या रंगाचा महिंद्रा ट्रॅक्टर आपल्या विनाक्रमांकाचा ट्रेलर मध्ये वाळू वाहतूक करताना आढळून आला आहे.या प्रकरणी फिर्यादी तलाठी पऱ्हाड यांनी ट्रॅक्टर व ट्रॉली घेऊन आरोपीस कोपरगाव तहसील कार्यालयात घेऊन जाण्यासाठी आदेश दिला असता आरोपीने ट्रॅक्टर व ट्रेलर रस्त्यावर ठेऊन नजीकच्या उसाचे शेतात पळून गेला आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं.१२०/२०२० भा.द.वि.कलम ३७९,१८८,२६९,२७०,सह साथ रोग प्रतिबंधक कायदा कलंम १८९७ चे कलम २,३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ए.एम.आंधळे हे करीत आहेत.दरम्यान या प्रकरणी पोलिसानी ट्रॅक्टर, ट्रॉली एक ब्रास वाळू असा ५ लक्ष ५३ हजार ९६५ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close