जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

…या दिंडीचे गुहा येथे जोरदार स्वागत !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   शिर्डी येथील श्री साईबाबा भव्य पायी पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर पंढरपूरकडे रवाना झाला असून त्यांचा गुहा येथील श्री साई मंदिरात महामंडलेश्वर श्री स्वामी काशिकानंद महाराज यांचा साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सुरेश वाबळे  यांनी सत्कार केला आहे.

  

शिर्डी नजीक असलेल्या ह.भ.प.काशिकानंद महाराज यांचा दिंडी सोहळा राहुरी तालुक्यातील श्री क्षेत्र गुहा या ठिकाणी आला असता त्यांचा सत्कार करताना साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सुरेश वाबळे व त्यांचे सहकारी दिसत आहेत.

   वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय.वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे.ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते.आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते.तर राज्यातून अन्य ठिकाणी असलेल्या विविध श्रद्धाळू आपल्या गावाकडून या दिंडीत सामील होत असताना दिसून येत असताना असाच एक सोहळा गेल्या अनेक वर्षात अग्रस्थानी आला आहे.तो म्हणजे शिर्डी नजीक असलेल्या ह.भ.प.काशिकानंद महाराज यांचा दिंडी सोहळा आहे.त्याचे नुकतेच त्यांच्या मार्गदर्शनात प्रस्थान झाले आहे.तो गुहा या ठिकाणी पोहचला असता त्यांचे गुहा येथील विविध पदाधिकारी आणि ग्रामस्थ आदींनी स्वागत केले आहे.

   सदर प्रसंगी शिर्डी येथील श्रीसाईबाबा संस्थान कर्मचारी पतसंस्थांचे चेअरमन विठ्ठलराव पवार आदींनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या असल्याची माहिती हाती आली आहे.त्या वेळी राहुरी तालुक्यातील गुहा येथील प्रेरणा पतसंस्थेचे संचालक अशोक ऊर्हे व विष्णुपंत वर्पे उपस्थित होते

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close