जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

मानवनिर्मित आपत्तीचे व्यवस्थापन करणे शक्य-कोपरगावात माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

नैसर्गिक आपत्तीला रोखणे हे आपल्या हातामध्ये नाही परंतु कृत्रिम किंवा मानवनिर्मित आपत्तीला रोखणे किंवा त्यावर व्यवस्थापन करणे हे सर्वांच्या हातामध्ये असल्याचे प्रतिपादन गॅस सेल्फ इंडिया लिमिटेडचे विभागीय विक्री व्यवस्थापक विवेक साळवे यांनी व्यक्त केले आहे.

“मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित असे आपत्तीचे दोन प्रकार आहेत.विशेषत: हवामानातील बदलामुळे नैसर्गिक आपत्तीत आकस्मिकपणे उदभवते.त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीत जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यासाठी या दोन्हीचा अभ्यास आवश्यक आहे”-विवेक साळवे,गॅस सेल्फ इंडिया लिमिटेडचे विभागीय विक्री व्यवस्थापक.

कोपरगाव येथील स्थानिक के. जे. सोमय्या महाविद्यालयात प्रशासकीय विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाच्या वतीने ‘आपत्ती व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेच्या निमित्ताने ते बोलत होते. कार्यक्रमाचेच ध्यक्ष प्राचार्य डॉ.बी.एस.यादव हे होते.

सदर प्रसंगी कार्यशाळेसाठी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,विश्वस्त संदिप रोहमारे,विज्ञानशाखा प्रमुख प्रो.बी.बी.भोसले,आय.क्यू.ए.सी.समन्वयक प्रा.विजय ठाणगे,डॉ.अभिजीत नाईकवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित असे आपत्तीचे दोन प्रकार आहेत.विशेषत: हवामानातील बदलामुळे नैसर्गिक आपत्तीत आकस्मिकपणे उदभवते.त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीत जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आपण दैनंदिन व्यवहारातही बघतो जर एखाद्या वाहनाला फार मोठा अपघात झाला किंवा एखादी व्यक्ती अपघातात जखमी झाली तर त्यांना उपचारासाठी,त्यांचे प्राण वाचविण्यासाठी समाजातील अनेकजण धावपळ करतात.एकंदरित सांगावयाचे झाल्यास मानवी संवेदनामुळेच ही सकारात्मक कृती समाजाकडूनच घडते तसेच यामध्ये प्रशासनाच्या वतीनेसुध्दा योग्य ती दखल घेतली जाते,म्हणूनच आपत्ती व्यवस्थापन आणि लोकांचा सहभाग ह्यांच नातं फार जवळच आहे असेही ते शेवटी म्हणाले आहे.

यावेळी त्यांनी एल.पी.जी.गॅसची माहिती देतानांच महाविद्यालयात प्रयोगशाळा, वसतिगृह व इतर ठिकाणी गॅस सिलिंडर वापरतांना घ्यावयाची काळजी व आपत्तीच्या वेळी करावयाची उपाययोजना या संदर्भात विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. नैसर्गिक व मानवनिर्मित आग लागल्यानंतर फायर एक्स्टिंग्विशरच्या साह्याने आग विझविण्यासाठीची तातडीची व्यवस्था केली जाते.परंतु हे यंत्र चालविण्याची माहिती अनेकांना नसते.फायर एक्स्टिंग्विशर आपत्कालीन परिस्थितीमध्ये कशाप्रकारे वापरावे याची माहिती व प्रात्यक्षिक त्यांनी यावेळी दिली आहे.

सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव हे म्हणाले की,”आपत्ती व्यवस्थापन या विषयावर बोलतांना शिक्षक व विद्यार्थी यांना जोडणारा महत्वाचा सेतु कार्यालयीन कर्मचारी हा असतो असे प्रतिपादन केले आहे. आपत्तीच्या काळात प्रशासकीय कर्मचारी जर प्रशिक्षित असेल तर तो होणाऱ्या दुर्घटनेला रोखु शकतो.याच उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन केले जाते असे नमूद केले आहे.

या कार्यशाळेचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय कार्यालयीन अधिक्षक डॉ.अभिजीत नाईकवाडे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार हिंदी विभागप्रमुख डॉ.संजय दवंगे यांनी केले आहे.यावेळी महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक,प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close