कोपरगाव तालुका
वारीत एक चालकास उपचार्थ केले रुग्णालयात दाखल !
संपादक-नानासाहेब जवरे
वारी-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या आग्नेय बाजूस साधारण चौदा की.मी.अंतरावर असलेल्या वारी ग्रामपंचायत हद्दीतील गोदावरी बायोरिफायनरीज कंपनीत एका कंटेनर चालकाला कोरोना बाधीत असल्याचे लक्षणे दिसुन आले असल्याची बातमी हाती आली आहे.त्यामुळे वारी परिसरातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
तथापि सदर कंपनीच्या एका अधिकाऱ्यांशी पोलीस प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,”चालकास अशक्तपणा जाणवत असल्याने पूर्व प्राथमिकता म्हणून तपासनीस पाठवले आहे.त्यामुळे ग्रामस्थांनी लगेच घाबरून जाण्याचे कारण नाही”.
या संबंधी सविस्तर वृतांत असा की, या कंपनीत केमिकल्स वाहतुक करणारे ५०-७० टँकर, कंटेनर तसेच कोळसाचे ट्रक आदींची नेहमीच गर्दी असते.कंपनीत विविध ठिकाणाहून विविध रसायने भरलेले टँकर्स येत असतात.तर निर्यात होणारे रासायनिक कँटेनर मधुन मुंबई बंदरात जात असतात.त्यातील एका कंटेनरच्या चालकास अशक्तपणा व कोरोना सदृश लक्षणे उलट्या होणे,चकर येणे आदी प्रकार झाल्यामुळे त्यांस कंपनीच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीने कळवली आहे..त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. जर हा संशयीत रुग्ण सकारात्मक निघाला तर तो किती लोकांच्या संपर्कात आला असेल या भीतीने ग्रामस्थांची गाळण उडाली आहे.