जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

संचारबंदीचे उल्लंघन,कोपरगावात एकावर कारवाई

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात नागरिकांच्या जीविताला धोका उत्पन्न निर्माण होईल असे वर्तन विनाकारण गर्दी केल्याच्या कारणावरून कोपरगाव शहर पोलिसानी संभाजी चौकात रहिवाशी असलेला तरुण पलाश चंद्रकांत भंडारी याच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

नगर जिल्ह्यात हि संख्या ३६ वर जाऊन पोहचली आहे तर चौघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.तरीही काही तरुण व नागरिक या बाबतीत गंभीर व्हायला तयार नाही हि अत्यंत दुखदायी घटना मानावी लागेल.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या २३५ ने वाढून ती २८ हजार १२५ इतकी झाली असून ८८७ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ८ हजार ०६८ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ३४२ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ३६ वर जाऊन पोहचली आहे तर चौघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.तरीही काही तरुण व नागरिक या बाबतीत गंभीर व्हायला तयार नाही हि अत्यंत दुखदायी घटना मानावी लागेल.तालुका प्रशासन व शहर पोलीस आपल्या जीवाचे रान करून शहरातील नागरिकांची काळजी घेता असताना मोठ्या संख्येने नागरिकांनी सहकार्य केल्याने कोरोना साथ नियंत्रणात अली असताना आता पुन्हा रुग्ण निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे मात्र काही तरुण या बाबत अद्याप गंभीर व्हायला तयार दिसत नाही.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसानी आपला खाक्या दाखवत पलाश भंडारी या तरुणाविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.१४५/२०२० भा.द.वि.कलम १८८(२),२६९,२७१,२९० मोटर वाहन कायदा कलम २५०(२),१७७ प्रमाणे फिर्यादी पो.कॉ.अंबादास रामनाथ वाघ (वय-३३) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.या आधीही कोपरगाव पोलिसानी अनेक प्रतिष्ठीतांविरुद्ध कारवाई करून दणका दिला आहे त्यात आता या तरुणांच्या कारवाईची भर पडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close