जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

येवला तालुक्यातील नागरिकांशी संपर्क टाळावा-तहसीलदार

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका व मालेगाव शहरात कोरोना साथीची लागण झालेले नागरिक बहुसंख्येने आढळत असल्याने कोपरगाव तालुक्यातील नागरिकांनी या ठिकाणच्या नागरिकांचा संपर्क काही दिवस टाळावा असे आवाहन कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे नुकतेच केले आहे.

दरम्यान या बाबत कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांनीही याच पद्धतीचे आवाहन कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना आपल्या दुपारी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.व नागरिकांनी आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या २३५ ने वाढून ती २८ हजार १२५ इतकी झाली असून ८८७ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ८ हजार ०६८ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ३४२ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ३६ वर जाऊन पोहचली आहे तर चौघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषद हद्दीत एक तर शिंगणापूर येथे एक असे दोन रुग्ण दगावल्याने कोपरगाव तालुक्यातही भीतीचे वातावरण आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तालुक्यातील नागरीकांना येवला,मालेगावचा संदर्भ देऊन हे आवाहन केले आहे.त्यामुळे त्याला महत्व प्राप्त झाले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close