जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सार्वजनिक शांतता भंग,सेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील सुभाषनगर येथे काल सायंकाळी पावणे सातच्या सुमारास भोंग्यावर मोठ्या आवाजात देवी-देवतांची आरती लावून सार्वजनिक शांतता भंग केल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी सुनील उर्फ भैय्या श्रीकांत तिवारी (वय-४५), त्रिजोग उर्फ बबलू श्रीकांत तिवारी (वय-४४) दोघे रा.सुभाष नगर यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने व संबंधित सेनेचा पदाधिकारी असल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहरातील सुभाषनगर येथे साईबाबा मंदिरात सुनील तिवारी व त्याचा भाऊ बबलू तिवारी यांनी भोंग्यावर मोठ्या आवाजात देवीदेवतांची आरती लावून सार्वजनिक शांतता भंग केली आहे.शिवाय आपल्या तोंडाला मास्क न लावता विनाकारण घराबाहेर पडून समाजाला व मानवाला धोका होईल असे व शहरात संचारबंदी आहे हे माहिती असताना विनाकारण बाहेर फिरून समाजास धोका पोहचेल असे कृत्य केले असल्याचा दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ४८३ ने वाढून ती २६ हजार ७६६ इतकी झाली असून ८३७ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ७ हजार ६२८ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ३२३ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ३५ वर जाऊन पोहचली आहे तर दोघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.त्यामुळे पोलिसानी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा १९८६ चे कलम ५१ लागू केलेले आहे.नागरिकांना एकत्र येण्यास धार्मिक देवीदेवतांची पूजा करण्यास, सार्वजनिक शांतता भंग करण्यास प्रतिबंध घातलेला आहे.असे असतानाही कोपरगाव शहरातील सुभाषनगर येथे साईबाबा मंदिरात सुनील तिवारी व त्याचा भाऊ बबलू तिवारी यांनी भोंग्यावर मोठ्या आवाजात देवीदेवतांची आरती लावून सार्वजनिक शांतता भंग केली आहे.शिवाय आपल्या तोंडाला मास्क न लावता विनाकारण घराबाहेर पडून समाजाला व मानवाला धोका होईल असे व शहरात संचारबंदी आहे हे माहिती असताना विनाकारण बाहेर फिरून समाजास धोका पोहचेल असे कृत्य केले असल्याचा गुन्हा र.न. १४४/२०२० भा.द.वि.कलम १८८(२),२६९,२७१,२९० महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३(१) (एन)सह पर्यावरण (संरक्षण )कायदा १९८६ चे कलम १५ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ प्रमाणे फिर्यादी पो.कॉ.रामकृष्ण गोरख खारतोडे (वय-२८)यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करीत आहेत.या आधीही कोपरगाव पोलिसानी अनेक प्रतिष्ठीतांविरुद्ध कारवाई करून दणका दिला आहे त्यात आता सेनेच्या जिल्हा पातळीवर कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यावर कारवाईची भर पडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close