जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या सणाला गर्दी करू नका-अधिकाऱ्यांचे आवाहन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

रमजान हा सण मुस्लिम बांधवांसाठी महत्वाचा असला तरी नागरिकांना प्रथम आपले जीवित अत्यंत महत्वाचे असल्याने नागरिकांनी नमाजसाठी कुठेही गर्दी करू नये असे आवाहन शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी नुकतेच कोपरगाव येथे एका बैठकीत बोलताना केले आहे.

कोरोना विषाणूची देशातील नागरिकांना झाली आहे.तर यात ७२५ इतके नागरिक आपल्या जीवनाला मुकले आहे.तर २३ हजार २२६ नागरिक कोरोनाने बाधित झाले आहे.त्यातच दिल्लीत तबलीगी जमातीच्या मरकजने कहर केल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.त्यामुळे शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नुकतीच एक तातडीची बैठक घेतली असून शहर हद्दीतील सर्व मस्जिदीतील मौलाना यांना निमंत्रित करण्यात आले होते.

जगातील मुस्लीम बांधवांच्या उपवासाच्या महिन्याला प्रारंभ झाला आहे.यालाच ‘रमजान’चा अर्थात ‘बरकती’ चा महिनाही म्हणतात. मनामनातील दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव,सद्भाव वाढविणारा हा महिना.संयम,त्याग,शांती,सहिष्णुता,चांगुलपणा,प्रामाणिकपणा माणसांच्या ठायी रुजविणारा हा महिना गणला जातो. माणसाला वाईटापासून,वासनेपासून शेकडो मैल दूर ठेवणारा हा महिना.या महिनचे महात्म्य, पावित्र्य सांगावे तेवढे थोडेच आहे.मनाचं मागणं पूर्ण करणार्‍या,बरकतीची मुक्तपणे उधळण करणार्‍या या महिन्याच्या चंद्राची तमाम मुस्लीम बांधव अधीरतेने प्रतीक्षा करीत असतात.
या महिन्यातच हजरत मुहम्मद पैगंबरांना त्यांच्या अखंड साधनेचे, खडतर तपश्चर्येचे फळ प्राप्त झाले.अर्थात त्यांना अल्लाहचे दर्शन झाले.ज्या परमेश्वराच्या साक्षात्कारासाठी हजरत मुहम्मद पैगंबरांनी तहान,भूक,ऐहिक गोष्टींना तिलांजली देऊन परमेश्वराची इमानेइतबारे सेवा केली,तो परमेश्वर त्यांना याच महिन्यात त्यांना प्रसन्न झाला असल्याची मान्यता आहे.त्यांची ईशसेवा खर्‍या अर्थाने कबूल झाली.पैगंबरांची हि तपश्चर्या स्वत:साठी मुळीच नव्हती.ती सेवा होती लोककल्याणासाठी,समस्त मानवाच्या मुक्तीसाठी.या महिन्यापासूनच पवित्र कुराणाचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचण्याला सुरुवात झाली असे मानले जाते.त्यामुळे रमजान या माहिनीला मुस्लिम समाजात विशेष स्थान आहे.मात्र यावर्षी नवीन वर्ष प्रारंभ होतानाच जगभर व देशात कोरोना या विषाणूने थैमान घातला आहे.त्याची लागण भारतात होऊन या विषाणूची लागण होऊन आता त्याची बाधा इतक्या नागरिकांना झालीय आहे.तर यात ७२५ इतके नागरिक आपल्या जीवनाला मुकले आहे.तर २३ हजार २२६ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यातच दिल्लीत तबलीगी जमातीच्या मरकजने कहर केल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.त्यामुळे शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नुकतीच एक तातडीची बैठक घेतली असून शहर हद्दीतील सर्व मस्जिदीतील मौलाना यांना निमंत्रित करण्यात आले होते.त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सदर प्रसंगी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे.कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर,शहर व तालुका हद्दीतील सर्व मौलाना हजर होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,राज्यात साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ लागू आहे.या शिवाय भारतीय दंड संहिता जमावबंदीचे कलम १४४ लागू आहे.दि.१४ मार्च रोजी शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोरोना विषाणूंचा संसर्ग वा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंदात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय,धार्मिक,क्रीडाविषयक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.रमजान सण हा त्याला अपवाद नाही.त्यामुळे नागरिकांनी नमाज अदा करण्यासाठी इफ्तार पार्टी आयोजित करण्यासाठी एकत्र येणे हि बाब हि साथ रोखण्यात मोठा अडथळा होऊ शकतो त्यामुळे जीवित हानी होऊ शकते.त्यामुळे मस्जिदीत घरावर,घरासमोर,तीन पेक्षा अधिक नागरिकांनी एकत्र येऊ नये असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी केले तर सूत्रसंचलन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी केले उपस्थितांचे आभार उपनिरीक्षक भारत नागरे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close