जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुकागुन्हे विषयक

..या संस्थेने रमजान निमित्त केले वस्तूंचे वाटप

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील सूर्यतेज संस्थेच्या वतीने मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु होत असल्याचे निमित्ताने कोपरगांव खडकी येथील मिफ्ताहुल उलूम मदरसा येथे शिक्षण घेणारे सुमारे २४ विद्यार्थ्यांना उपवासाचे पदार्थ, किराणा,साबण आणि जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या आहेत.

कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषद हद्दीत सूर्यतेजसह अनेक सामाजिक संस्थांनी आपल्या परीने नागरिक,आर्थिक दुर्बल घटक,मजूर शाळा,महाविद्यालयातील विद्यार्थी यांना मदत करण्याची भूमिका घेऊन सामाजिक दायित्व निभावले आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ३२७ ने वाढून ती २४ हजार ७७४ इतकी झाली असून ७८४ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ६ हजार ८१७ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ३०१ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ३३ वर जाऊन पोहचली आहे तर दोघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषद हद्दीत अनेक सामाजिक संस्थांनी आपल्या परीने नागरिक,आर्थिक दुर्बल घटक,मजूर शाळा,महाविद्यालयातील विद्यार्थी यांना मदत करण्याची भूमिका घेऊन सामाजिक दायित्व निभावले आहे.कोपरगाव शहरातील सूर्यतेज या सामाजिक संस्थेने खडकी येथील निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या प्रसंगी कोपरगावचे निवासी नायब तहसीलदार योगेश कोतवाल,सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके,मिलिंद जोशी,मुकुल आहेर,विजय वाणी,ऊर्दू स्कूलचे मुख्याध्यापक रियाज शेख,मदरसाचे मौलाना मोहम्मद पठाण,हाफ़िज़ महफूज़ सिराज,सोहेल शेख आदिंसह विद्यार्थी व व्यवस्थापक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close