कोपरगाव तालुका
पशुवैद्यक कोरोनात व्यस्त ..या शेतकऱ्यांचे झाले हाल !
संपादक-नानासाहेब जवरे
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगावात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने जिल्हाधिकऱ्यानी या साथीला आळा घालण्यासाठी तालुक्यातील द्वितीय व तृतीय श्रेणीतील पशुवैद्यक या कामी जिल्हा सीमाहद्दीत वाहनांतील प्रवाशांची तपासणी करण्यासाठी नेमल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पशुधनाचे आरोग्य मात्र धोक्यात आल्याची माहिती उपलब्ध झाल्याने या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना आपल्या कर्तव्यावर पुन्हा एकदा नेमण्यात यावे अशी मागणी कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
कोपरगाव तालुक्यात कोरोनाचे दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यातील द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील पशुवैद्यक अधिकाऱ्यांची नेमणूक या कोरोना साथीवर नियंत्रण आणण्याच्या कर्तव्यावर करण्यात आली होती.सरकारने जनता संचार बंदी २२ मार्च रोजी व त्यानंतर २४ मार्च रोजी देशभर टाळेबंदी जाहीर करून या टाळेबंदीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध खात्याच्या सरकारी अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते.त्यात पशुवैद्यक अधिकाऱ्यांचा समावेश होता.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या १८७ ने वाढून ती २३ हजार २२६ इतकी झाली असून ७२५ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ६ हजार ४२७वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने २८३ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ३२ वर जाऊन पोहचली आहे तर दोघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यातील द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील अधिकाऱ्यांची नेमणूक या कोरोना साथीवर नियंत्रण आणण्याच्या कर्तव्यावर करण्यात आली होती.
सरकारने जनता संचार बंदी २२ मार्च रोजी व त्यानंतर २४ मार्च रोजी देशभर टाळेबंदी जाहीर करून या टाळेबंदीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध खात्याच्या सरकारी अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते.त्यात पशुवैद्यक अधिकाऱ्यांचा समावेश होता.शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाची गणना होते.रोख चलन मिळवून देण्यात या व्यवसायाचे महत्वाचे स्थान आहे.ग्रामीण भागात तर गोधन दारात नाही असे घर सापडणे अवघड इतका या व्यवसायाचा मोठा व्याप आहे.मात्र कोरोना साथीमुळे या व्यवसायावर गंडांतर आले आहे.शहर आणि खेडी यांचा संवाद तुटला आहे.पर्यायाने दूध शहरातील ग्राहकांकडे जाणे अवघड बनले आहे.त्यातच इकडे या व्यवसायात या गोधनाचे आरोग्य राखण्यात मोलाची भूमिका पार पडणारे पशुवैद्यक हे कोरोना साथ नियंत्रणात गुंतल्याने पशुधनाचे आरोग्यच धोक्यात आले आहे.त्यामुळे या पशुवैद्यक अधिकाऱ्यांना या कामी पुन्हा एकदा जुंपण्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्हाधिकारी यांनी या प्रश्नी दाखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांचे पशुधन वाचवावे अशी मागणी शेतकऱ्यांनी शेवटी केली आहे.