जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सॅनिटायझर वाटप हा पालिकेस बदनाम करण्याचा डाव- वहाडणे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात सॅनिटायझर वाटप करण्याचे नाटक करून कोपरगाव नगरपरिषदेस बदनाम करण्याचे षडयंत्र कोल्हे गटाने रचले असून ते कधीच यशस्वी होणार नसल्याचा आरोप कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज दुपारी एक वाजेच्या सुमारास आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोपरगाव नगरपरिषदेस मोफत सॅनिटायझर वाटपाचे पत्र कोपरगाव पालिकेस दिले त्याचे छायाचित्र

नगरपरिषद हद्दीतील प्रत्येक कुटंबास १८० मी.ली.ची बाटली ९० रुपये किमंत असताना बाटली २० रुपये या अत्यल्प दरात हँड सॅनिटायझर उपलब्ध करून देण्याचे कोल्हे गटाने जाहीर केले.त्यानुसार आम्ही दिनांक १५ एप्रिल रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना पत्राव्दारे कळविले होते की,कोरोना आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने कोपरगांव शहरात घरटी एक सॅनिटायझर बाटली मोफत वाटणे गरजेचे आहे परंतु आमच्या मागणीस सहा दिवस उलटूनही कुठलाही प्रतिसाद दिला नाही मग आम्ही शहरात नागरिकांना मोफत सॅनिटायझर वाटण्यास प्रारंभ केला आहे-उपनगराध्यक्ष योगेश बागुल.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या १८७ ने वाढून ती २३ हजार २२६ इतकी झाली असून ७२५ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ६ हजार ४२७वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने २८३ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ३२ वर जाऊन पोहचली आहे तर दोघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष योगेश बागुल व कोल्हे गटाचे गटनेते रवींद्र पाठक यांनी कोपरगाव नगरपरिषदेवर आरोप करत कोल्हे कारखाना पालिकेस अल्पदरात सॅनिटायझर देत असताना पालिकेने त्यास प्रतिसाद न दिल्याचा आरोप केल्याने आता कोरोना या भीषण साथीच्या काळातही कोपरगाव तालुक्याची राजकारणाची गाडी पुन्हा मूळपदावर आल्याचे दिसून येत आहे.त्याला उत्तर म्हणून पालिकेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी हा आरोप केला आहे.

त्या वेळी पत्रकार परिषदेत अध्यक्ष वहाडणे पुढे म्हणाले की,कोल्हे गटाच्या नेत्यांनीच आपण तालुक्यात नागरिकांना मोफत सॅनिटायझरच्या बाटल्या मोफत वाटणार असल्याच्या बातम्या पसरवल्या होत्या व त्यांनीच १५ एप्रिल रोजी पालिकेने या बाटल्या २० रुपये किंतीस खरेदी कराव्या असे पत्र दिले होते.असे सांगून त्यांनी त्याचा पुरावाच हजर केला आहे.त्यावर उपनगराध्यक्ष योगेश बागुल व गटनेते रवींद्र पाठक यांच्या सह्या आहेत.व शहर व तालुक्यात मोफत वाटण्याचे जे काम चालू आहे ते एक उत्तम प्रकारे वटवलेले नाटक असल्याचा पुरावा सादर केला आहे.एका ग्रामपंचायतीस हेच सॅनिटायझर ठेव विक्री केल्याची पावतीच वहाडणे यांनी पत्रकार परिषदेत दाखवली व तालुक्यात कोल्हे यांनी जाहीर केल्या प्रमाणे ४५ हजार कुटुंबे दाखवत आले मात्र तालुक्यात ६९ हजार २०८ कुटुंबे असल्याचे सांगितले आहे.व दानशूर पणाचा जो आव आणत आहे ते एक थोतांड असल्याचा आरोप केला आहे.व जनतेला मूर्खात काढण्याचा तो एक प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोमेश्वर सहकारी कारखान्याने हेच सॅनिटायझर केवळ १०० रुपये लिटरने वाटप करणार असल्याचे जाहीर केलेले असताना कोपरगावात कधीकाळी राष्ट्रवादीत असताना पाईक असलेले नेते हे सॅनिटायझर २ हजार रुपये लिटरचा भाव घेत असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

या उलट आ. आशुतोष काळे यांनी नागरपरिषदेस पत्र देऊन आपण कोपरगाव शहरातील नागरिकांना मोफत सॅनिटायझर वाटप करणार असल्याचे कळवले आहे.त्याचे पत्रच दाखवले व कोल्हे गटाची हवा काढण्याचा साधार प्रयत्न केला आहे.व निवडणुकीत कोट्यावधी रुपये व आंबट औषधे उधळणाऱ्यांनी जनता अडचणीच्या काळात असताना सॅनिटायझर मोफत का दिले नाही असा सवाल केला आहे.कोणी आपले पाप झाकण्यासाठी आमच्यावर आरोप करत असतील तर आम्ही हयगय करणार नाही असा इशाराही अध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close