क्रीडा विभाग
राज्यस्तरीय स्पर्धेत…हि शाळा पुणे विभागाचे नेतृत्व करणार-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अ.नगर येथील जिल्हा क्रीडा अधिकारी व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कुल,गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने १७ व १९ वर्षाखालील मुला-मुलींच्या शालेय विभागीय हॉकी स्पर्धा दिनांक ६ व ७ नोव्हेंबर रोजी गौतम पब्लिक स्कुलच्या हॉकी मैदानावर पार पडल्या असून १७ वर्षाखालील मुला-मुलींच्या विजेत्या संघांना संस्थेचे विश्वस्त आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले असून गौतम पब्लिक स्कूलचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

“गौतम पब्लिक स्कुलने शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सर्वच क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी करत क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे हि अतिशय अभिमानास्पद बाब आहे”- आ.आशुतोष काळे.
या स्पर्धेचे उदघाटन शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या हस्ते झाले.स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दि.०६ रोजी १७ वर्षाखालील मुला-मुलींच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या व दुसऱ्या दिवशी दि.०७ रोजी १९ वर्षाखालील मुला-मुलींच्या स्पर्धा पार पडल्या यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी सर्व खेळाडूंशी सुसंवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या.गौतम पब्लिक स्कुल क्रीडा क्षेत्रात करीत असलेल्या कामगिरी बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या स्पर्धेत अ.नगर ग्रामीण संघ म्हणून खेळतांना गौतम पब्लिक स्कुल संघाने सोलापूर शहर संघाचा ३-० असा पराभव केला तर मुलींच्या गटात पीसीएमसी संघाने पुणे ग्रामीण संघाचा २-० असा पराभव करत विजेतेपद पटकाविले.सदर संघ बालेवाडी, पुणे येथे दिनांक २२ ते २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी यावेळी दिली.संस्थेचे अध्यक्ष माजी आ.अशोक काळे,विश्वस्त व आ.आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव चैताली काळे,सर्व संस्था सदस्य,प्राचार्य नूर शेख यांनी गौतमच्या विजयी संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक सुधाकर निलक,हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे,राजेंद्र आढाव,इसाक सय्यद सर्व हाऊस मास्टर्स काम पाहत आहे.
“गौतम पब्लिक स्कुलने शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सर्वच क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी करत क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे हि अतिशय अभिमानास्पद बाब आहे”- आ.आशुतोष काळे.