जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात..या परिसरात किराणा वस्तू वाटप संपन्न

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लागू असलेल्या टाळेबंदीमुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे.उद्योगधंदे बंद,रिकाम्या हातांना काम नाही परिणामस्वरूप अनेकांच्या संसाराचा गाडा चालण्यास प्रचंड अडचणी येत असून त्यातून आर्थिक दुर्बल घटकाना आपले जीवन सुसह्य व्हावे यासाठी कोपरंगाव येथील समता चॅरिटेबल ट्रस्ट व कोजागिरी मित्र मंडळ यांच्या माध्यमातून कोपरगाव शहरातील प्रभाग २ मधील बहुसंख्य कुटुंबांना आवश्यक किराणा सामानाचे वाटप कोपरगाव शहराचे पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे व दीपक बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

देशात टाळेबंदी लागू असल्याने नागरिकांना घरातच राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.त्यामुळे नागरिकांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळली आहे.त्यामुळे नागरिकांचे जगण्यासाठी हाल होत आहे,अशा परिस्थतीत अनेक सामाजीक संस्था पुढे येऊन या नागरीकांना दिलासा देत असून यात कोपरगाव शहरातील समता चॅरिटेबल ट्रस्ट,कोजागिरी मित्र मंडळ यांचा समावेश आहे.

त्याप्रसंगी नगरसेवक जनार्दन कदम वैभव गिरमे, डॉ. प्रफुल्ल कुडके, तुषार आहेर, नितीन उराडे, गौरव भावसार,विष्णुपंत गायकवाड, प्रताप जोशी, अमोल राजूरकर,विवेक जोशी, वसंत डुकरे, सचिन हाडोळे,विजय बोथरा, संतोष आढाव, संतोष बैरागी, दशरथ सरवान आदी कार्यकर्ते उपस्थित होते

या उपक्रमास राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांचे सहकार्य लाभले असल्याची माहिती या प्रभागाचे नगरसेवक जनार्दन कदम यांनी आमच्या प्रतिनिधिस दिली आहे.या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close