कोपरगाव तालुका
..या बंधाऱ्यात पाणी अडविण्याचे नियोजन बैठक संपन्न

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरंगाव (प्रतिनिधी)
आगामी पावसाळ्यात गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या मंजूर बंधाऱ्यात पाणी अडविण्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता संगीता जगताप,कार्यकारी अभियंता श्री पाटील या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.
कोपरगाव तालुक्यातील मंजूर बंधारा गोदावरी नदीस आलेल्या पुरामुळे दोन वेळा वाहून गेला होता.त्यामुळे मंजूर बंधाऱ्यावर अवलंबुन असणाऱ्या शेतकऱ्यांचे भविष्य उध्वस्त झाले होते.पावसाळा अवघा काही दिवसावर येऊन ठेपला आहे.त्यामुळे जलसंपदाची प्रलंबित कामे मार्गी लावणे गरजेचे आहे.त्यामुळे हि जलसंपदा अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.
सदर प्रसंगी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता संगिता जगताप, कार्यकारी अभियंता पाटील, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोक तिरसे, सचिन चांदगुडे, विठ्ठल जामदार, संदीप जाधव, शाखा अभियंता राऊत, शाखा अभियंता तेलंगे आदी मान्यवर उपस्थित होते.