जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात दोन गटात तुंबळ हाणामाऱ्या,सात जणांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावात शहरातील सुभाषनगर येथे रात्री आठ वाजेच्या सुमारास दोन गटात मागील भांडणाच्या कारणावरून झालेल्या तुंबळ हाणामारीत दोन जण गंभीर जखमी झाले असून या दोन्ही गटांनी एकमेकावर गुन्हे दाखल केले आहेत तर कोपरगाव पोलिसानी या सात जणांवर सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवार दि.१५ एप्रिल रोजी दुपारी चार वाजे च्या सुमारास सुभाषनगर येथील सार्वजनिक सौचालयाजवळ सिद्धार्थ दुशिंग हा उभा असता त्याला मुजाहिद कुरेशी याने हरकत घेतली होती त्यावरून दोन्ही गटात भांडणे झाली होती.बुधवारी २२एप्रिल रोजी मुजाहिद कुरेशी याचा भाऊ उजेब कुरेशी हा रस्त्याने जात असता योगेश शिंदे याने त्यास हटकले व तुचं भाऊ मुजाहिद याने माझा मावसभाऊ सिद्धार्थ दुशिंग याला का मारहाण केली याचा जाब विचारल्याच्या कारणावरून हि हाणामारी जुंपली होती.

कोपरगावात सध्या तालुका प्रशासन कोरोना बंदोबस्तात व्यग्र असताना रात्री आठ वाजेच्या सुमारास एकाएकी सुभाषनगर या ठिकाणी आरडाओरडा ऐकू आल्याने त्या ठिकाणी कोपरगाव शहर पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली असता त्या ठिकाणी दोन गट लाठ्या-काठ्या घेऊन एकमेकास भिडलेले आढळले.त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर हे आपल्या फौज फाट्यासह गेले असता त्या ठिकाणी त्यांनी या दोन्ही गटांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता त्यातील काही महिलांनी अधिकाऱ्यांना असभ्य भाषेत बोलून त्यांच्या अंगावर चाल करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे.पोलिसानी दोन्ही गटाच्या तरूणानां ताब्यात घेतले आहे.आरोपी मुजाहिद मजीद कुरेशी,अन्सार कुरेशी, जब्बार कुरेशी,योगेश शिंदे, संजय शिंदे, सिद्धार्थ दुशिंग, उजेब मजीद कुरेशी, सर्व रा. सुभाषनगर यांच्यावर भा.द.वि.कलम १६०,१८८(२),२६९,२७१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या घटनेत पोलिसांना हि घटना समजल्यावर ते घटनास्थळी गेल्यावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आरोपींशी संबंधित महिला या अंगावर जाऊन त्यांना असभ्य भाषेत बोलल्याने फार गोंधळ झाला होता मात्र या घटनेनंतर पोलिसानी आरोपींना काठ्या तुटेपर्यंत चांगलेच झोडपून काढल्याचे वृत्त आहे.दरम्यान यातील उजेब कुरेशी अल्पवयीन असल्याने त्यास वगळता सर्व जणांना पोलिसानी अटक केली आहे.

दरम्यान योगेश संजय शिंदे (वय-२०) याने आरोपी मुजाहिद कुरेशी, अन्सार कुरेशी, जब्बार गफ्फार कुरेशी,उजेड मजीद कुरेशी.सर्व रा.आयेशा कॉलनी कोपरगाव यांचे विरुद्ध तर फिर्यादी मुजाहिद मजीद कुरेशी याने आरोपी योगेश शिंदे,संजय रामभाऊ शिंदे,सिद्धार्थ संजय दुशिंग सर्व रा.सुभाष नगर यांच्या विरुद्ध गु.र.न.१४०/२०२० भा.द.वि.कलम ३२४,३३७,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मान गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.डी. तिकोणे,आर.पी. पुंड हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close