नगर जिल्हा
..या गावात मोफत धान्य वाटप योजनेस प्रारंभ

संपादक-नानासाहेब जवरे
नांदुर्खी (वार्ताहर)
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत राहाता तालुक्यातील नांदुर्खी खुर्द गावांमधील स्वस्त धान्य दुकानात मोफत तांदूळ वाटप सुरू करण्यात आले आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानात मोफत तांदुळाचे वाटप स्वस्त धान्य दुकानदार अजित मवाळ यांच्या हस्ते व आधी सहप्रमुख उपस्थित वाटप सुरू करण्यात आले.
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय योजनापात्र कुटुंबाला लाभार्थी त्यांच्याकरता प्रत्येक व्यक्तीला पाच किलो मोफत तांदूळ वाटप करण्यात येत असून कार्डधारकांनीं सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. दरम्यान या योजनेचा नांदुर्खी मधील नागरिकांना मोफत तांदूळ वाटप सुरू झाले आहे.
शासन मान्य स्वस्त धान्य दुकानातील धान्य वाटपाची शिस्त व उपाय योजना सामाजिक अंतर पालन करण्यात येत आहेत.१७ एप्रिल पासून स्वस्त धान्य दुकानांमधून कोरोना या विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व धान्य दुकानातील येणारे प्रत्येक ग्राहकांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय योजनापात्र कुटुंबाला लाभार्थी त्यांच्याकरता प्रत्येक व्यक्तीला पाच किलो मोफत तांदूळ वाटप करण्यात येत असून कार्डधारकांनीं सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. दरम्यान या योजनेचा नांदुर्खी मधील नागरिकांना मोफत तांदूळ वाटप सुरू झाले आहे. नेहमीत धान्य नेणाऱ्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.यात केसरी कार्डधारकांचा समावेश आहे. कोरोना च्या संकटकाळात धान्य दुकानदार जीवावर उदार होऊन धान्य वाटपाचे काम करीत आहे तरी नागरिकांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे हे असे आवाहान आहे स्वस्त धान्य दुकानदार अजित मवाळ यांनी शेवटी केले आहे.