कोपरगाव तालुका
कोपरगाव येथे १०० बेडचे कोविड केअर सेंटर सज्ज
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात टाळेबंदीच्या काळात नियमितपणे वैद्यकीय सेवा मिळत आहे. प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यासाठी ज्या रुग्णांना सर्दी,खोकला, ताप, दमा व श्वास घेण्यास त्रास होत असेल अशा रुग्णांना भरती करून उपचार करण्यासाठी सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालय येथील मुलींचे वसतिगृहात १०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे-आ. आशुतोष काळे
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ५३ ने वाढून ती १७ हजार ३५७ इतकी झाली असून ५६० जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ४ हजार २०० वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने २२३ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या २९ वर जाऊन पोहचली आहे तर दोघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील साठ वर्षीय महिलेचे कोरोना संसर्गाने निधन झाले असून त्या पाठोपाठ शिंगणापूर येथील एका महिलेचे सारी सदृष्य आजाराने बळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने आगाऊ उपाय योजना करण्यात येत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ मे पर्यंत टाळेबंदी शासनाने जाहीर केलेली आहे. या काळात सर्दी,खोकला,ताप अशा रुग्णांसाठी फोनच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टरांचा मोफत वैद्यकीय सल्ला तसेच गरजू रुग्णांसाठी कम्युनिटी क्लिनिक देखील सुरु केले आहे. शेकडो रुग्णांना टाळेबंदीच्या काळात नियमितपणे वैद्यकीय सेवा मिळत आहे. प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यासाठी ज्या रुग्णांना सर्दी,खोकला, ताप, दमा व श्वास घेण्यास त्रास होत असेल अशा रुग्णांना भरती करून उपचार करण्यासाठी सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालय येथील मुलींचे वसतिगृहात १०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरमध्यर खाजगी व सरकारी डॉक्टर या रुग्णांवर उपचार करणार असून वरिष्ठ स्तरावरून परवानगी मिळताच हे कोविड केअर सेंटर लवकरच सुरू होणार असल्याचे आ.काळे यांनी सांगितले आहे.कोपरगावात तालुक्यात तहसीलदार योगेश चंद्रे,गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौन्दर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाटे,कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,शहर पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर,ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल कटके चांगल्या प्रकारे काम करीत असून नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या घरातच बसून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.