जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या गावात मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीवर होणार कारवाई !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात व देशात कोरोना विषाणूने कहर केल्याने त्यावर उपचार नसल्याने आता यापुढे कोपरगांव नगरपरिषद कार्यक्षेत्रात या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत असून त्या उपाययोजनेचा भाग म्हणून कोपरगाव शहरातील सार्वजनिक कामाच्या ठिकाणी मास्क न वापरणे व थुंकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे आता बेपर्वा असणाऱ्या नागरिकांना आता सावध रहावे लागणार आहे.

तोंडाला मास्क अथवा रुमाल न वापरणाऱ्या व्यक्तीस तसेच सार्वजनिक ठिकाणच्या रस्ता,कार्यालय परिसर,किंवा अत्यावश्यकसेवा आस्थापने परिसर आदी ठिकाणी थुंकलेले आढळल्यास प्रथम रक्कम रुपये ५०० रुपये दंड आकरण्यात येईल.दुस-या वेळेस तीच व्यक्ती परत वरील प्रमाणे कृती करतांना आढळल्यास रक्कम रुपये १००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.तिसऱ्या वेळेस सदर व्यक्ती परत सापडल्यास रक्कम रुपये २००० रुपये दंड व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे- मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,कोपरगाव पालिका

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ३५५ ने वाढून ती १४ हजार ७०७ इतकी झाली असून ४९६ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर ती १६५ ने वाढून संख्या ३ हजार ३२० वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने २०१ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या २८ वर जाऊन पोहचली आहे तर दोघाचा मृत्यू झाला आहे.कोपरगावात दोन महिलांना आपला बळी द्यावा लागला आहे.देशभरात अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.रुग्णवाढ गत दोन-तीन दिवसात कमी होत असली तरी ती थांबलेली नाही.त्यामुळे शासनाचे सर्व अधिकारी व नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.या विषाणूंचा प्रसार रोखणे हे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.हा विषाणू शिंकण्यातून व थुंकीवाटे प्रसार होत असल्याने अनेक राज्यांनी आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व मास्क न लावणे हा गंभीर गुन्हा मानण्यास प्रारंभ केला आहे.त्याला आता कोपरगाव नगर परिषद अपवाद नाही.

कोपरगाव नगरपरिषदेने आता या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना एक प्रसिद्धि पत्रकांवये मास्कचा वापर करणे अनिवार्य केले आहे.या खेरीज सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध केला आहे.सदरचे मास्क नामांकीत प्रतीचे अथवा घरगुती पद्धतीने तयार केलेले व योग्य पद्धतीने स्वच्छ व निर्जंतूक करून पुन्हा वापरता येण्याजोगे आवश्यक आहे अथवा रुमालाने तोंड झाकणे आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक जागी थुंकण्यास सक्त मनाई आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबधिताविरुद्ध साथ रोग प्रतिबंधक अधिनियम १८७९,आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय दंड संहिता १८०७ चे कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.
तोंडाला मास्क अथवा रुमाल न वापरणाऱ्या व्यक्तीस तसेच सार्वजनिक ठिकाणच्या रस्ता,कार्यालय परिसर,किंवा अत्यावश्यकसेवा आस्थापने परिसर आदी ठिकाणी थुंकलेले आढळल्यास प्रथम रक्कम रुपये ५०० रुपये दंड आकरण्यात येईल.दुस-या वेळेस तीच व्यक्ती परत वरील प्रमाणे कृती करतांना आढळल्यास रक्कम रुपये १००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.तिसऱ्या वेळेस सदर व्यक्ती परत सापडल्यास रक्कम रुपये २००० रुपये दंड व फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली आहे.त्यामुळे नागरिकांत खळबळ उडाली आहे.
याबाबत शहरातील सर्वच भागात नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांचे पथके कार्यरत राहाणार आहे.सार्वजनिक ठिकाणी,कामाच्या ठिकाणी मास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्ती आढळल्यास सदर पथक त्यांच्यावर कारवाई करून त्यांची नोंद घेवून दंड वसूल करणार आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close