नगर जिल्हा
..या संस्थेकडून गरजूंना धान्य वाटप संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
लोहगाव-(प्रतिनिधी)
कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक दुर्बल घटक,मजूर आदींची मोठी कोंडी झाल्याच्या पार्श्वभूमीवर राहाता तालुक्यातील लोहगाव ग्रामपंचायत हद्दीत मजुरांना नुकतेच खा.डॉ.सुजय विखे यांच्या उपस्थितीत जनसेवा फौंडेशनच्या वतीने धान्य वाटप करण्यात आले आहे.
टाळेबंदीच्या प्रतिकूल परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्यांना लोहगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या नागरिकांना खा. डॉ.सुजय विखे यांच्या उपस्थितीत गरजू कुटुंबाला धान्य वाटप करण्यात आलेली आहे. त्यांच्यासाठी जनसेवे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांमार्फत धान्य वाटपाचे नियोजन करण्यात आलेले आहे.
२४ मार्च पासून सुरू झालेल्या २१ दिवसाची टाळेबंदी वाढविण्यात आली आहे. व त्यानंतर तीन मे पर्यंत ती वाढविण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात पहिल्यांदाच १३५ कोटी लोकसंख्या असणारा देश घरात बंदिस्त झाला आहे.भारत देशाची आर्थिक, अत्यावश्यक सर्व सेवा व सर्व उद्योग, बस सेवा, विमान सेवा,सर्व काही बंद करण्यात आले आहे, रस्ते ओस पडली आहे.सर्वजण आपल्या घरात बंदिस्त आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्यांना खा. डॉ.सुजय विखे यांच्या उपस्थितीत गरजू कुटुंबाला धान्य वाटप करण्यात आलेली आहे. त्यांच्यासाठी जनसेवे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांमार्फत धान्य वाटपाचे नियोजन करण्यात आलेले आहे.
यावेळी सरपंच स्मिता भाऊसाहेब चेचरे, उपसरपंच सुरेश गणपत चेचरे,अॅड.बाबासाहेब चेचरे, संचालक भाऊसाहेब चेचरे,गणेश चेचरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानदेव चेचरे, उपाध्यक्ष भाऊसाहेब चेचरे,सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चेचरे, शांताराम चेचरे, सतिश गिरमे, संजय सुरडकर, अण्णा माघाडे, शिवाजी सोनवणे, गणेश गायकवाड, सोपान चेचरे, कृष्णा चेचरे यांनी लोहगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणावर सामाजिक अंतराचे पालन करून गरजू कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले जनसेवा फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्त्यांचे गावातील आजी-माजी पदाधिकारी तसेच गरजूंनी या उपक्रमाबद्दल आभार कौतुक व्यक्त केले आहे
.