जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

भरधाव दुचाकीचा अपघात एक ठार,एक जखमी !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरानजीक गोदावरीनदीकाठी असलेल्या छोट्या पुलाच्या दक्षिण बाजूस असलेल्या तीव्र वळणावर आपल्या ताब्यातील बजाज पल्सर गाडीचे (क्रं.एम.एच.१७ सी.पी.४२८३) नियंत्रण सुटून आज पहाटे ४.१५ वां.झालेल्या अपघातात जित रामदास गर्जे (वय -२५) रा.निवारा कोपरगाव हा तरुण वैद्यकीय उपचारा दरम्यान ठार झाला असून त्याचा सहकारी यश धुमाळ हा गंभीर जखमी झाला असल्याची माहिती पोलिसांकडून समजली आहे.

  

कोपरगाव गोदावरी नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी या पुलाच्या दक्षिण बाजूस असलेले तीव्र वळण धोकादायक बनले आहे.त्या वळणावर एक तर गतिरोधक नसल्याचे बेभान तरुण त्याची तमा बाळगत नाही व वेगाने त्या ठिकाणी पुलावर प्रवेश करून आपली गाडी वळवतात परिणामी पुढील पुलावर अपघातांना निमंत्रण मिळत आहे.अशीच घटना आज पहाटे ४.२५ वाजता घडली आहे.

  

उपचार सुरू असताना जखमी तरुण आणि मदत करणारे तरुण दिसत आहेत.

   कोपरगाव शहराच्या नजिक असलेल्या अनेक रस्त्यांचे  काम सुरू आहे.त्यामुळे अपघातात मोठी वाढ होताना दिसत आहे.मात्र सदर रस्त्यांचे काम मात्र वेगाने करण्याची तसदी रस्ते प्रशासन व राजकीय नेतृत्व घेताना दिसत नाही.परिणामी यात अनेक प्रवासी आणि नागरिकांचा हकनाक बळी जात आहे.अशीच घटना आज पहाटे ४.१५ वाजता कोपरगाव शहराच्या दक्षिणेस असलेल्या गोदावरी नदीवर असलेल्या छोट्या पुलावर घडली आहे.या पुलाचे काम सन -२००८-०९ साली पूर्ण झाले असले तरी या पुलाच्या दक्षिण बाजूस असलेले तीव्र वळण धोकादायक बनले आहे.त्या वळणावर एक तर गतिरोधक नसल्याचे बेभान तरुण त्याची तमा बाळगत नाही व वेगाने त्या ठिकाणी पुलावर प्रवेश करून आपली गाडी वळवतात परिणामी पुढील पुलावर अपघातांना निमंत्रण मिळत आहे.अशीच घटना आज पहाटे ४.२५ वाजता घडली आहे.यातील मयत तरुण जित गर्जे हा आपला सहकारी यश धुमाळ असे दोघे आपल्या ताब्यातील बजाज पल्सर घेऊन नगर-मनमाड रस्त्याकडून कोपरगाव येथे येत असताना त्यांनी वेगावर नियंत्रण ठेवले नाही.परिणामी त्यांच्या गाडीवर असलेले नियंत्रण सुटून सदर दुचाकी थेट गोदावरी नदीत कोसळली होती.

अपघातग्रस्त दुचाकी बजाज पल्सर दिसत आहे.

   दरम्यान याची खबर पोलिसांना अज्ञात इसमाने पोलिस सहाय्यक क्रमांक -११२ कळवली होती.परिणामी शहर पोलिसांनी या घटनास्थळी धाव घेतली होती.त्यात पोलिस शिपाई घुले हे आघाडीवर होते.त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांच्या सहाय्याने त्यांना नदीतून वर काढून उपचारार्थ खाजगी रुग्णालयात भरती केले होते.मात्र उपचारादरम्यान यातील दुचाकीस्वार जित गर्जे हा मयत झाला असल्याची माहिती  प्राप्त झाली आहे.तर दुसरा त्याचा सहकारी यश धुमाळ हा गंभीर जखमी झाला आहे.त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

घटनास्थळी जखमी अवस्थेत दिसत असलेला तरुण.

   या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात केवळ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेले आहे मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.पुढील तपास कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.को.बी.एस.कोरेकर हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close