जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात आता गटनिहाय जनता दरबार !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   मतदार संघातील नागरिकांचे शासकीय कार्यातील कामे खोळंबून राहू नये यासाठी जनता दरबार सुरु केले आहे त्यांना सहकार्य करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघातील धामोरी येथे समस्या निवारण बैठकीत उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

           

“कोपरगाव तालुक्यातील नागरिकांच्या कामात चालढकल करण्यासाठी कागदपत्रांच्या आडून नागरीकांना त्रास देवू नका.नागरीकांचे गावांतर्गत प्रश्न वेळेत सुटले पाहिजे याची काळजी घ्या”- आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

   सन -२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या ऐतिहसिक मताधिक्याबद्दल नागरीकांचे आभार मानण्यासाठी व शासकीय कार्यातील नागरीकांचे प्रश्न सोडविण्यासाठी धामोरी येथे विविध विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत समस्या निवारण बैठक व आभार दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते.

   सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी,नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे,पुरवठा अधिकारी अमोल फोफसे,महावितरणच्या सहाय्यक अभियंता रंजना करसाळे,युनियन बँकेचे मॅनेजर प्रमोद पुरी,विस्तार अधिकारी बबन वाघमोडे,पंचायत समिती अभियंता अश्विन वाघ,राजेंद्र दिघे,कृषी सहाय्यक योगेश माळी,पशु संवर्धन अधिकारी संतोष मासाळ,तालुका आरोग्य सहाय्यक विरेंद्र वाकचौरे,वैद्यकीय अधिकारी डॉ.सुषमा सांजेकर,मंडलाधिकारी जफार पठाण,तलाठी सौरभ धुमाने,कालवा निरीक्षक सोमनाथ गांगुर्डे, कृषी सहाय्यक सचिन कोष्टी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close