जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव शहराच्या पायाभूत सुविधांसाठी निधी द्या-यांची मागणी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराची लोकसंख्या व हद्दवाढ दिवसेंदिवस वाढत असून त्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी व मुख्य रस्त्यांसह हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासासाठी निधी द्या अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे एका कार्यक्रमात केली आहे.

कोपरगाव शहराच्या प्रस्तावित असलेल्या पाच नंबर साठवण तलावाची तांत्रिक मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. त्या प्रस्तावास आपल्या नगरविकास विभागाकडून मजुरी देवून शहरातील नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करावे-आ.आशुतोष काळे

अहमदनगर येथे नुकतेच ना.एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर महानगरपालिका व नगरपालिका आढावा बैठक पार पडली.यावेळी आ.काळे यांनी कोपरगाव शहराच्या हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासाच्या प्रश्नाबरोबरच इतरही विकासाच्या प्रश्नांकडे ना. शिंदे यांचे लक्ष वेधतांना बोलत होते.

या प्रसंगी नगरविकास विभागाचे मुख्य सचिव महेश पाठक,जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले,पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अहमदनगर महानगरपालिकेचे महापौर बाबासाहेब वाकळे,नगराध्यक्ष विजय वहाडणे,कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील गंगूले,नगरसेवक वीरेन बोरावके,मंदार पहाडे,संदीप पगारे,अजीज शेख,गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी त्यांनी कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पाच नंबर साठवण तलावाचे महत्व लक्षात आणून दिले.प्रस्तावित असलेल्या पाच नंबर साठवण तलावाची तांत्रिक मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. त्या प्रस्तावास आपल्या नगरविकास विभागाकडून मजुरी देवून शहरातील नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करावे. तसेच कोपरगाव शहरातील सर्वच मुख्य रस्ते,हद्दवाढ झालेल्या भागातील रस्ते,पाणीपुरवठा व भूमिगत गटारींसाठी निधी मिळावा. कोपरगाव शहरातील शासकीय जागेवर राहत असलेल्या नागरिकांची अतिक्रमणे नियमित होवून सदर जागेचे उतारे त्या रहिवाशांच्या नावावर करून मिळावे आदी मागन्या त्यांनी ना.शिंदे यांच्याकडे केल्या आहेत. सदर मागण्यांचा विचार करून लवकरात लवकर या मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही ना. एकनाथ शिंदे यांनी आ.काळे यांना दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close