जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

..त्या मदरशात आक्षेपार्ह कोणी नाही-पो.नि.यांचा दावा

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरानजीक वायव्येस साधारण अडीच की.मी.अंतरावर असलेल्या खडकी या उपनगरालगत असलेल्या मदरशात अथवा धार्मिक स्थळात कोणीही आक्षेपार्ह व्यक्ती नाही कोणीही शहरात अफवा पसरू नये प्रशासन अत्यंत दक्ष असून सगळीकडे कडक लक्ष असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

संग्रहित फोटो

पोलीस प्रशासन अत्यंत सतर्क असून सर्वच संशयीत ठिकाणे तपासली आहेत.खडकी नजीक असलेल्या मदरशात तपासणी केली असून तेथे बिहार मधील २४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.अन्य संशयित कोणी नाही.नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये.प्रशासन दक्ष आहे-पो.नि.मानगावकर

लॉकडाउन लागू होऊन १३ दिवस लोटले आहेत. तरीही देशात करोनाच्या संसर्गाचा जोर कमी झालेला नाही.उलट दिवसागणिक रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या देशातील मृतांचा आकडा चार हजारांच्या वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडाही शंभरच्या पलिकडे गेला आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे केंद्र सरकार आवश्यक आरोग्य सामुग्रीचा आढावा घेत असून, जूनपर्यंत भारताला करोनाशी संबंधित आरोग्याची साधन मोठ्या प्रमाणावर लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान दिल्लीतील तबलिगी जमातीत सामील असलेले नागरिक राहाता तालुक्यातील सात गावात थांबले होते त्या २५ जणांना ताब्यात घेतले तर त्या आधी संगमनेर शहरात १५ जण आढळल्याने उत्ततर नगर जिल्ह्यातही भीतीचे वातावरण पसरले होते.

संग्रहित फोटो

दिल्लीतील तबलिगी जमातीत सामील असलेले नागरिक राहाता तालुक्यातील सात गावात थांबले होते त्या २५ जणांना ताब्यात घेतले तर त्या आधी संगमनेर शहरात १५ जण आढळल्याने कोपरगाव तालुक्यासह उत्तर नगर जिल्ह्यातही भीतीचे वातावरण पसरले होते.

त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातही अफवांचे मोठ्या प्रमाणात पीक आल्याचे दिसून आले आहे.दरम्यान खडकी नजीक असलेल्या एका अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक स्थळी व मदरशात काही परप्रांतीय नागरिकांनी आसरा घेतल्याचा वावड्या उठल्या होत्या.या बाबत नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.आमच्या प्रतिनिधीने या बाबत कोपरगावचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचेशी थेट संपर्क साधला असता त्यांनी या बाबत बोलताना म्हटले आहे की,”पोलीस प्रशासन अत्यंत सतर्क असून सर्वच संशयीत ठिकाणे तपासली आहेत.खडकी नजीक असलेल्या मदरशात तपासणी केली असून तेथे बिहार मधील २४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.अन्य संशयित कोणी नाही.नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये.प्रशासन दक्ष आहे.नागरिकांनी विनाकारण आपल्या घराच्या बाहेर पडू नये त्यातच त्यांचे भले आहे फेक बातम्या व व्हिडीओ वर कोणीही विशेष ठेऊ नये”त्यामुळे शहरात पसरलेली ती अफवांचे असल्याचे सिद्ध झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close