कोपरगाव तालुका
..या गावातील जि.प. शाळेत शालेय पोषण आहार वाटप
संपादक-नानासाहेब जवरे
धारणगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतेच विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून त्यांना शालेय पोषण आहाराच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊन चे सर्व नियम काटेकरपणे पाळत हे वाटप करण्यात आले आहे.यावेळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १३३ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले आहे.
या वाटप कार्यक्रमात कोरनोच्या मुकाबला करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपापल्या घरातच राहावे, अत्यावश्यक कामासाठी बाहेर निघाल्यास तोंडावर रुमाल वापरावा, साबणाने हात स्वच्छ धुवावेत, आपल्या पाल्यांना जपावे,दक्षता घ्यावी, या काळात स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे, अशा विविध सूचना व पालकांना कोरोना विषयी काळजी घेण्याचे आवाहन व्यवस्थापन समितीचे सदस्य रिनाकांत कबाडी यांनी केले.
वर्तमानात कोरोना विषाणूच्या साथीने देशभरात थैमान घातल्याने गत अकरा दिवसापाससून नागरिकांना घरकैद करण्यात आले आहे.त्यामुळे अन्य समस्याप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांचा आहार वाटपात अडथळा निर्माण झाला आहे.त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने पालकांना शाळेत बोलावून हा शालेय आहार वाटप करण्याचा निर्णय घेतला होता.त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब चतुर यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय पोषण आहार शिल्लक धान्यसाठा वाटप करण्यात आला.त्यात प्रामुख्याने तांदूळ ,हरभरा, मठ,तूरडाळ, मुगडाळ, यांचा समावेश होता.राज्यात कोरोना व्हायरस या रोगाने थैमान घातले आहे. कोरोना च्या पार्श्वभूमी वर देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे,कोरेनाचा मुकाबला करण्यासाठी देशभर अत्यावश्यक सेवा सोडून सर्वकाही बंद करण्यात आले असून सर्व शाळा ,महाविद्यालय, प्राथमिक शाळा यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे शाळा बंद आहेत, विद्यार्थी शाळेत येत नसल्यामुळे अशा परिस्थितीत शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शालेय पोषण आहार बंद आहे.कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेचे मुख्याध्यापक श्री जगदाळे यांनी केले.हे शालेय पोषण आहार धान्य वाटप करण्यासाठी भांडकुळे सर, झाडे सर, गोविंद सोनवणे यांनी परिश्रम घेतले.शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ,स्थानिक पदाधिकारी, व पालक उपस्थित होते.सर्व पालक ,शिक्षक ,पदाधिकारी यांनी मास्क बांधून सामाजिक अंतराचे नियम पाळत सॅनिटीझरचा वापर केला त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक जगदाळे यांनी सर्वाचे आभार मानले.