जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

यंदाचा चैत्रमहोत्सव केला तीन व्यक्तींनी साजरा !

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील आत्मा मालीक ध्यानपिठात दरवर्षी तिन दिवशीय चैत्रमहोत्सवाचा कार्यक्रम म्हणजे भक्तांच्या गर्दीचा सागर महापूर असायचा. विविध कार्यक्रमाने हा परिसर भक्तीमय वातावरणाने फुलुन जात होता. मात्र यावर्षीचा चैत्रमहोत्सव कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भक्ताविना केवळ तीन व्यक्तींच्या हस्ते साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला आहे.

या वर्षीचा चैत्रमहोत्सव सर्व भावीकांनी आपल्या घरी बसुन ध्यानाच्या माध्यमातून चैत्राच्या पर्वा वरती आत्मदेवतेकडे प्रार्थना करुन करोना संक्रमणावरती समस्त मानव जातीच्या कल्याणाची मागणी करत विजय मिळवावा.ध्यान करा ध्यानी बना या गुरुदेवांच्या संदेशाचे पालन करावे- परमानंद महाराज

आत्मा मालीक ध्यानपिठात ५ ते ७ एप्रिल या दरम्यान तीन दिवशीय चैत्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते मात्र करोना विषाणुचा संसर्ग होवू नये म्हणुन देशभरातील सर्व धार्मीक स्थळांसह इतर ठिकाणातील गर्दीचे सर्व कार्यक्रम, उत्सव साजरे न करण्याचे आवाहान पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहानाला प्रतिसाद देण्या बरोबरच करोनाच्या संकटाला आळा घालण्यासाठी आत्मा मालीक ध्यानपिठातील मानाचा चैत्रमहोत्सव हा कार्यक्रम भक्ताविना विधीवत करण्याचा निर्णय आत्मामालीक ध्यानपिठाचे प्रमुख जंगलीदास महाराजांनी घेतला आहे. या निर्णयाने लाखो भक्तांची निराशा झाली आहे.मात्र चैत्रमहोत्सव कार्यक्रमाच्या परंपरेला खंड पडू नये म्हणून आश्रमाचे संत परमानंद महाराज,विवेकानंद महाराज, निजानंद महाराज, चंद्रानंद महाराज यांनी रविवारी पहाटे आत्मस्वरूप प्रतिमेची व पादुकांची विधीवत पुजा,अभिषेक करुन ध्यान साधना करीत आत्मचिंतन केले. करोनामुळे या संतानी विषेश अंतरावर बसुन ध्यान साधना केली. या प्रसंगी परमानंद महाराज यांनी घरी बसलेल्या भाविकांना गुरुमाऊलींचा संदेश देताना म्हणाले की, प्रतिवर्षी ध्यानपिठात चैत्रमहोत्सवात तीन दिवस सत्संग,सामुदायिक ध्यानपाठ,भजन, प्रवचन, आरती अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याचे एकच उद्दिष्ट आहे की, माणसाला त्यांच्या जीवनातील जीवनत्व अर्थात ह्दयस्त विराजीत आत्म्याचं ज्ञान होवून दर्शन व्हावे.आत्मचिंतनाच्या माध्यमातून या विश्वात शांती प्रस्थापित करण्याचा उदात्त हेतू गुरूमाऊलींचा आहे.तेव्हा भावीकांनी आहे त्या ठिकाणी बसुन यावर्षीचा चैत्रमहोत्सव साजरा करावा तोही ध्यानाच्या माध्यमातून करोनाचा पराभव करावा. शासकीय निमयांचे कोणीही उल्लंघन करू नये. आश्रमाच्या तीन दिवशीय चैत्र महोत्सवात साजरे होणारे सर्व धार्मीक विधी,ध्यान,योगा, प्राणायम,गुरूसंदेश आदी कार्यक्रम मोजके संतगण करीत आहेत असे सांगून भाविकांना चैत्रमहोत्सवाच्या शुभेच्छा दिल्याआहेत.

तर आश्रमात करोनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा ठेवली असुन कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही. गर्दीचे सर्व नियोजीत कार्यक्रम रद्द केल्याची माहीती आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी दिली. तसेच चैत्र महोत्सवाच्या भावीकांना सुर्यवंशी यांनी शुभेच्छा देवून करोनापासुन सुरक्षीत राहण्यासाठी घरी बसुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.नेहमी गजबजलेल्या ध्यानपिठात सध्या शुकशुकाट दिसत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close