जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

लॉक डाऊनमध्येही या गावात कंपनी सुरु,नागरिकांत भीती

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोना विषाणूने सारे जग भयग्रस्त झाले असताना या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातील सार्व कंपन्या व आस्थापने सरकारने बंद केले असतानाही कोपरगाव तालुक्यातील वारी ग्रामपंचायत हद्दीतील रासायनिक पदार्थांचे उत्पादन करणारी जुनी कंपनी अद्याप सुरूच असल्याने नागरिकांनी या बाबत आश्चर्य व्यक्त केले असून या कामगारांना व परिसरातील नागरिकांना या विषाणूची भीती नाही का ? असा सवाल परिसरातील नागरिकांनी जिल्हा व तालुका प्रशासनास उपस्थितीत केला आहे.

नगर जिल्ह्यात १७ रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासन तणावात आले आहे.त्याला कोपरगाव शहरही अपवाद नाही.कोरोना कोपरगाव तालुक्याच्या शिवेवर येऊन ठेपला असताना खरे तर या बाबत कोपरगाव शहर व तालुक्यात अधिकची खबरदारी घेणे गरजेचे असताना कोपरगाव तालुक्यातील वारी ग्रामपंचायत हद्दीत मात्र नेमका याचा उलट अनुभव येताना दिसत आहे.तालुक्यात कोरोना साथ येऊ नये यासाठी तालुका प्रशासन डोळ्यात तेल घालून दक्षता घेता असताना वारी नजीक पूर्वी खाजगी तत्वावर साखर कारखाना असलेल्या मात्र आता रासायनिक उत्पादन असलेल्या प्रसिद्ध खाजगी कारखान्यात मात्र राजरोस सुमारे पाचशे कामगारांना आपल्या घरातून बोलावून त्यांच्याकडून सक्तीने काम करून घेतले जात आहे.या बाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्यात कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांची संख्या ६३५ वर पोहचली आहे तर आतापर्यंत ३४ जणांनी आपले प्राण सोडले आहेत.मुंबई पाठोपाठ पुण्यातही करोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. पुण्यात करोनामुळे चोवीस तासात आणखी तीन बळी गेले आहेत. करोना सदृश्य लक्षणं आढळून आल्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच ससूनमध्येच एका ४८ वर्षीय करोनाबाधित पुरुषाचा देखील मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.नगर जिल्ह्यात १७ रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासन तणावात आले आहे.त्याला कोपरगाव शहरही अपवाद नाही.कोरोना कोपरगाव तालुक्याच्या शिवेवर येऊन ठेपला असताना खरे तर या बाबत कोपरगाव शहर व तालुक्यात अधिकची खबरदारी घेणे गरजेचे असताना कोपरगाव तालुक्यातील वारी ग्रामपंचायत हद्दीत मात्र नेमका याचा उलट अनुभव येताना दिसत आहे.

तालुक्यात कोरोना साथ येऊ नये यासाठी तालुका प्रशासन डोळ्यात तेल घालून दक्षता घेता असताना वारी नजीक पूर्वी खाजगी तत्वावर साखर कारखाना असलेल्या मात्र आता रासायनिक उत्पादन असलेल्या व मागे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या एका प्रसिद्ध खाजगी कारखान्यात मात्र राजरोस सुमारे पाचशे कामगारांना आपल्या घरातून बोलावून त्यांच्याकडून सक्तीने काम करून घेतले जात आहे.या बाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.या कंपनीत साधारण नजीकचे असलेले शहरे श्रीरामपुर, राहाता, कोपरगाव, शिर्डी आदी ठिकाणाहुन कामगार कंपनीत कामासाठी येतात. तसेच मुंबई येथून बंदरात परदेशातून येणारे कंटेनर या कंपनीत रसायन उत्पादने भरण्यासाठी येतात.तसेच आता हैद्राबाद येथील टँकरही केमिकल्स घेण्यासाठी येत आहेत. चौकशी केली असता समजले की संँनिटायझर बनविण्यासाठी कंपनी चालू ठेवलेली आहे.परंतु सँनिटायझर बनविण्यासाठी अँसिड लागते काय ? फक्त आर ॲण्ड डी मध्ये बनविता येते.त्यासाठी बाॕयलर चालू करुन वेगवेगळे केमिकल्सचे प्लांट चालू करण्याची गरज नसते. संपूर्ण केमिकल्स कंपनी चालू करून वारीगाव व परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना कोरोनाचा संसर्ग पसरविण्याचे काम या कंपनीतून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जोपर्यंत लाॕकडाऊन चालू आहे तोपर्यत ही कंपनी बंद ठेवण्यासाठी प्रशासनाने त्वरीत कार्यवाही करण्यात यावी अशी परीसरातील संतप्त नागरिकांची मागणी आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close