कोपरगाव तालुका
अंत्योदय कुटुंब धारकांना मिळणार रेशनवर मोफत धान्य !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
संपूर्ण जगासह देश व राज्यात जीवघेण्या कोरोना विधान ने धुमाकूळ घातला आहे. इतर प्रगत देशांची कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करतांना जी धांदल उडाली अशी परिस्थिती आपल्या देशात निर्माण होऊ नये यासाठी पंधरा एप्रिल पर्यंत सम्पूर्ण देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे.त्यामुळे आर्थिक दुर्बल कुटुंबावर उपासमारीची वेळ टाळण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी दारिद्र्य रेषेखालील अंत्योदय योजनेतील कुटुंबांना शिधा पत्रिकेवर मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. कोपरगाव येथील महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट श्री.साईबाबा तपोभूमी यांच्या वतीने ६ लाख ८३ हजार रुपयांचा धनादेश रेशन दुकान संघटनेचे अध्यक्ष कैलास बोरावके यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
कोपरगाव तालुक्यातील दारिद्र्य रेषेखालील अंत्योदय योजनेतील एकूण ६ हजार ९०० नऊशे कार्डधारकांना व साधारण ३५ ते ४० हजार नागरिकांना फायदा होणार आहे. प्रत्येक कुटुंबाला २७ किलो गहू,९ किलो तांदूळ व १ किलो साखर असे एकूण १७९४ क्विंटल गहू,६२१ क्विंटल तांदूळ व ६९ क्विंटल साखर मोफत वितरित केली जाणार आहे.
सम्पूर्ण देशात लॉक डाऊन असल्यामुळे सर्व काही ठप्प आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी प्रशासनासह प्रत्येक नागरिक काळजी घेत आहे. मात्र अशा कठीण परिस्थितीत आर्थिक दुर्बल घटकांना आपल्या कुटुंबाचे पोट भरणाऱ्या नागरिकांच्या हाताला रोजगार नाही. त्यामुळे शिधा घेण्यासाठी रक्कम आणायची कोठून अशा विवंचनेत हे दारिद्र्य रेषेखालील अंतोदय योजनेतील कुटुंब पडले होते. दारिद्र्य रेषेखालील या कुटुंबांना मोफत धान्य मिळणार असल्यामुळे या कुटुंबाला पडलेला अन्नधान्याचा अतिशय महत्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे. आ.आशुतोष काळे यांनी या दारिद्र्य रेषेखालील अंत्योदय योजनेतील एकूण ६ हजार ९०० नऊशे कार्डधारकांना व जवळपास ३५ ते ४० हजार नागरिकांना फायदा होणार आहे. प्रत्येक कुटुंबाला २७ किलो गहू,९ किलो तांदूळ व १ किलो साखर असे एकूण १७९४ क्विंटल गहू,६२१ क्विंटल तांदूळ व ६९ क्विंटल साखर मोफत वितरित केली जाणार आहे अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.
या प्रसंगी पुरवठा अधिकारी सचिन बिन्नोर,महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट श्री.साईबाबा तपोभूमीचे सचिव धरमकूमार बागरेचा, विश्वस्त दत्तोबा जगताप,मनोहर कृष्णानी, रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष कैलास बोरावके, उपाध्यक्ष जनार्दन जगताप, सचिव फकिरा टेके, रेशन दुकानदार उत्तम चरमळ,बाळासाहेब दवंगे, राजेंद्र होन आदी उपस्थित होते.