कोपरगाव तालुका
कोपरगावात समताच्या ठेवी आता ५३२ कोटींवर
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळीत अव्वलस्थानी असलेल्या समता नागरी सहकारी पतसंस्थेने या वर्षी ठेवींचा उच्चान्क गाठत आपल्या ठेवी तब्बल ५३२ कोटीवर नेऊन ठेवल्या आहेत सहकारी पतसंस्थेच्या चळवळीत हा उच्चान्क मानला जात आहे.या बद्ल समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी ठेवीदारांचे आभार मानले असून आमच्या प्रतिनिधींशी बोलताना समाधान व्यक्त केले आहे.
समता सहकारी पतसंस्थेच्या गत वित्तीय वर्षात ३१ मार्च २०२० पर्यंतच्या ठेवी मागील वर्षाच्या ४३२ कोटी रुपये होत्या.या वर्षी त्या उच्चान्क गाठत ५३२ कोटी रूपये इतक्या विक्रमी झाल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेने ठेवीचे वाढीचे प्रमाण २३.१४ % इतके झाले आहे. विशेषतः संस्थेच्या ठेवीत १०० कोटी रुपयांची वाढ झालेली असून महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीत हि संस्था अव्वल स्थानी आहे.
समता सहकारी पतसंस्थेच्या ३४ वर्षाच्या परंपरेप्रमाणे या वर्षीही ३१ मार्च रोजी आर्थिक पत्रके जाहीर करण्याची परंपरा चालू ठेवली आहे.सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षात ३१ मार्च २०२० रोजीच आर्थिक पत्रके प्रसिद्ध करण्यात आली आहे.
समता सहकारी पतसंस्थेच्या गत वित्तीय वर्षात ३१ मार्च २०२० पर्यंतच्या ठेवी मागील वर्षाच्या ४३२ कोटी रुपये होत्या.या वर्षी त्या उच्चान्क गाठत ५३२ कोटी रूपये इतक्या विक्रमी झाल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेने ठेवीचे वाढीचे प्रमाण २३.१४ % इतके झाले आहे. विशेषतः संस्थेच्या ठेवीत १०० कोटी रुपयांची वाढ झालेली असून महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीत हि संस्था अव्वल स्थानी आहे. तर मागील वर्षाचे कर्ज वाटप २९४ कोटी रुपये होते. या वर्षी ३७२ कोटी रुपये इतके कर्ज वाटप झाले आहे. कर्ज वाटपामध्ये देखील मागील वर्षाचे तुलनेत रु.७८ कोटी इतकी वाढ झालेली आहे. कर्ज वाढीचे प्रमाण २६.५३ % इतके आहे.
संस्थेची सुरक्षित गुंतवणूक ३१ मार्च अखेर १७६ कोटी २५ लाख रुपये एवढी असून याचे संस्थेच्या ठेवीशी प्रमाण ३३% आहे.या वर्षी ९११ कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय चे माध्यमातून ५ कोटी ५८ लाख ढोबळ नफा झाला झाला आहे.सध्याचे कोरोना व्हायरसमुळे देशात निर्माण झालेली आर्थिक मंदी व दुष्काळ सदृश्य परिस्थिती, भारतातील बँकिंग बद्दल संभ्रमाचे वातावरण या परिस्थितीत समता नागरी सहकारी पतसंस्थेने केलेली प्रगती लक्षवेधी ठरली आहे.